सुप्रिया सुळे
पुण्यातील कात्रज परिसराजवळ असणाऱ्या जांभुळवाडी तलावात काही दिवसांपूर्वी अनेक मासे अचानक मृत आढळले होते. आता पुन्हा एकदा या तलावात मासे आढळले आहेत. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळेच या माशांचा मृत्यू झाला आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
जांभुळवाडी तलावामध्ये केमिकल युक्त पाणी असल्याने मासे मृत झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. या पार्श्वभूमीवर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी जांभुळवाडी तलावाची पाहणी केली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “पुणे महापालिका आणि इरिगेशन खाते यांची तातडीने बैठक घेऊन हा प्रश्न सोडवावा. हा प्रश्न अतिशय गंभीर आहेत प्रदूषण प्रदूषणाचा नाही तर पिण्याचे पाणी देखील यामुळे धोक्यात येऊ शकते. प्रशासन पालकमंत्री आणि इरिगेशन खात्याला विनंती आहे की याकडे तातडीने लक्ष द्यावे.”
“पुणे महापालिकेचा हलगर्जीपणा या सर्व प्रकरणाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. समाज माध्यमांच्या माध्यमातून अशा प्रकारचे मासे खाऊ नयेत, यामुळे फूड होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी”, अशी विनंती देखील यावे सुप्रिया सुळे यांनी केली.