नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वडिलांचा मृत्यू, पुण्यात अंत्यसंस्कार
महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गौतमी पाटील ही तिच्या वडिलांपासून वेगळी रहात होती. तीन-चार दिवसांपूर्वी बेवारस अवनस्थेत तिचे वडील सापडलेले होते. बिबवेवाडी भागातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
गौतमीचे आई-वडील वेगळे राहतात. गौतमी तिच्या आईबरोबर राहते. गेल्या काही दिवसांपासून तिचे वडील रवींद्र पाटील यांची प्रकृती खालावली होती. धुळ्याजवळील सूरत महामार्गावर दुर्गेश चव्हाण यांना ते बेवारस अवस्थेत सापडले होते. सुरुवातीला त्यांची ओळख पटली नव्हती. त्यांना धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्याकडे आधारकार्ड सापडले. त्यानंतर चव्हाण यांनी गौतमशी संपर्क साधला.
त्यानंतर गौतमीने त्यांच्यावर पुण्यात उपचार करणार असल्याचे सांगितले होते. पुण्यातील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. त्यानंतर धनकवडी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.