गरीब असल्याचे भासवून फसवणाऱ्या महिलांवर गुन्हा

आम्ही खूप गरीब आहेत, आमच्या लहान मुलीला कपडे घेऊन द्या असा बहाणा करून दोन अनोळखी महिलांनी एका व्यक्तीला दुकानात नेऊन मुलांसाठी कपडे घेतले. याचवेळी हातचलाखी करून एटीएम कार्ड चोरले आणि सराफाच्या दुकानात जाऊन ५० हजार रूपयांचे सोने खरेदी केले, तसेच ठिकठिकाणच्या एटीएममधून ९६ हजारांची रोखही काढली. अशा प्रकारे एकूण एक लाख ४६ हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी दोन अनोळखी महिलांविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 26 May 2023
  • 12:55 am
गरीब असल्याचे भासवून फसवणाऱ्या महिलांवर गुन्हा

गरीब असल्याचे भासवून फसवणाऱ्या महिलांवर गुन्हा

हातचलाखीने एटीएम कार्ड चोरून लुटले दीड लाख

#हडपसर

आम्ही खूप गरीब आहेत, आमच्या लहान मुलीला कपडे घेऊन द्या असा बहाणा करून दोन अनोळखी महिलांनी एका व्यक्तीला दुकानात नेऊन मुलांसाठी कपडे घेतले. याचवेळी हातचलाखी करून एटीएम कार्ड चोरले आणि सराफाच्या दुकानात जाऊन ५० हजार रूपयांचे सोने खरेदी केले, तसेच ठिकठिकाणच्या एटीएममधून ९६ हजारांची रोखही काढली. अशा प्रकारे एकूण एक लाख ४६ हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी दोन अनोळखी महिलांविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अजिंक्य महादेव डोळस (३१, रा. तेज सोसायटी, कामधेनु इस्टेट, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पाच मे रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास तक्रारदार अजिंक्य यांचे वडील महादेव डोळस यांना दोन अनोळखी महिला भेटल्या. त्या महिलांनी डोळस यांना आम्ही खूप गरीब आहोत, आमच्या लहान मुलीला कपडे घेऊन द्या, अशी विनंती केली. हडपसर येथील सोनपरी ड्रेसेस या दुकानात त्या डोळस यांना घेऊन गेल्या.

कपडे खरेदी करताना हात चलाखी करून डोळस यांच्या बँकेचे एटीएम घेऊन कामधेनु इस्टेट येथील दुकानातून ५० हजारांचे सोने महिलांनी खरेदी केले. त्यासाठी चोरलेले कार्ड स्वाईप केले. नंतर त्यांनी ठिकठिकाणावरील एटीएम मधुन ९६ हजार रूपयेही काढले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस शोध घेत आहेत.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest