Pune Traffic : सिंहगड रोड वाहतूक विभाग अंतर्गत वाहतूकीत बदल

पुणे शहरातील सिंहगड रोड वाहतूक विभागअंतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता काही ठिकाणी वाहतूक बदल तसेच पार्किंग व्यवस्थेतील बदलाच्या अनुषंगाने काही अंतिम आदेश तसेच काही तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Wed, 27 Sep 2023
  • 12:35 pm
Pune Traffic

संग्रहित छायाचित्र

पुणे : पुणे शहरातील सिंहगड रोड वाहतूक विभागअंतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता काही ठिकाणी वाहतूक बदल तसेच पार्किंग व्यवस्थेतील बदलाच्या अनुषंगाने काही अंतिम आदेश तसेच काही तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.

पार्कींग बाबतच्या अंतिम आदेशानुसार गोयलगंगा चौकाकडून सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे जाताना गोयलगंगा चौक ते आय.सी.आय.सी.आय. बँकेपर्यंत (दुभाजक संपेपर्यंत) रस्त्याच्या दोन्ही बाजूला ५० मीटर पर्यंत नो पार्किंग क्षेत्र तयार करण्यात येत आहे. गोयलगंगा चौक ते आय.सी.आय.सी.आय. बँक ते अमृतगंगा सोसायटी गेट नं. ४ (शोरबा हॉटेल) पर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूला फक्त दुचाकी वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच रस्त्याच्या उजव्या बाजूस दुभाजक संपल्यानंतर मनपा प्रस्तावित नाट्यगृह ते अतिथी हॉटेलपर्यंत फक्त चारचाकी वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच रस्त्याच्या उजव्या बाजूस एच.डी.एफ.सी. बँकेपासून ते सोबा ऑप्टिमा सोसायटीचे गेट (प्रेमाचा चहा शॉप) पर्यंत फक्त दुचाकी वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे. 

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून गोयलगंगा चौकाकडे जाताना सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय चौक ते दुभाजक संपेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस १०० मीटर पर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे.

स्वारगेटकडून वडगाव पूल वीर बाजी पासलकर चौकाकडे येणारी वाहतूक सिंहगड रस्त्याने गणेशमळा सिग्नल येथे डावीकडे वळून जनता वसाहत कॅनॉल रस्त्याने कै. मिसाळ उद्यान (कॅनॉल जंक्शन) येथे डावीकडे वळवून कॅनॉलच्या उजव्या बाजूने आनंदविहार रस्त्याने तुकाईनगर चौकापर्यंत एकेरी करण्यात आली आहे.

वडगाव पूल (वीर बाजी पासलकर) चौकाकडून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक सिंहगड रस्ता क्षेत्रीय  कार्यालय चौकातून डावीकडे वळून  लंडन पूल चौक ते कै. मिसाळ उद्यान (कॅनॉल जंक्शन) चौकातून डावीकडे वळून विश्रांतीनगर चौकापर्यंत एकेरी वाहतूक करण्यात येत असून कै. मिसाळ उद्यान (कॅनॉल जंक्शन) कडून येणारी वाहने (कॅनॉलच्या डाव्याबाजूने) जाण्यास बंदी करण्यात आली आहे. 

दोन्ही कॅनॉल रस्ते जोडणाऱ्या लंडन पुलावरून हिंगणे ते महादेवनगरकडे जाण्याकरीता चारचाकी वाहनांना बंदी करण्यात येत असून फक्त दुचाकी वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे.

जनता वसाहत ते सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय फन टाईम थिएटर पर्यंत कॅनॉल रस्त्यावर जड वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. 

स्वारगेटकडून वडगाव पूलाकडे (वीर बाजी पासलकर चौक) येण्याकरीता व वडगाव पूलाकडून स्वारगेटकडे जाण्याकरीता (कॅनॉल रस्ता) पर्यायी रस्ता उपलब्ध असल्याने वाहन चालकांची व नागरिकांची गैरसोय होणार नाही.

वाहतूक व पार्किंगच्या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या तात्पुरत्या आदेशानुसार वडगाव पूल चौक ते नांदेड सिटी गेट चौकपर्यंत गर्दीच्या वेळेमध्ये (सकाळी ८.०० वा ते ११.०० वा. आणि सायं. १८.०० वा. ते २१.०० वा.) जड वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. श्री कंट्रोल चौकातून भूमकर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूस १०० मीटर पर्यंत, कंट्रोल चौकाकडून पारी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूस ५० मीटर पर्यंत आणि कंट्रोल चौकाकडून झील कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूस ३० मीटर पर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे.

ग्रीनपार्क, प्रथमेश तुलीप, स्वामिनी रेसिडन्सी सोसायटी समोरील सनसिटी रस्त्याकडे जाणाऱ्या डी.पी. रोडवर दोन्ही बाजूस व्यावसायिक वाहनांकरिता नो पार्किंग करण्यात येत आहे. 

तात्पुरत्या आदेशांच्या अनुषंगाने वाहतूक बदलाबाबत नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास त्या पोलीस उप आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात ९ ऑक्टोबर पर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उप आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest