संग्रहित छायाचित्र
पुणे : वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. डेक्कन वाहतुक विभागांतर्गत (Deccan Transport Division)गांधी क्लासीक कॉर्नरवरील व मॅजिस्टीक विल्स पासून पुढे पार्किंग व्यवस्थेत बदल (Changes in parking arrangements)करण्यात आले आहेत. या भागात यापूर्वी काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
कुठे असणार नो पार्किंग
गांधी क्लासीक अपा. (उजवी बाजू) कॉर्नरवर जोशी हॉस्पिटल बोर्डापासून पुढे लाईटचा पोल नंबर ८८/३४ पर्यंत तसेच मॅजिस्टीक विल्स पासून पुढे लाईट डीपी शेजारी असलेल्या शेफालीका सोसायटी पर्यंत १५ मीटर नो पार्किंग करण्यात आले आहे. अशी माहिती पुणे शहर वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.