Pune Metro : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 'मेट्रो'च्या वेळेत बदल

लक्ष्मीपूजनाच्या (Lakshmi Puja) दिवशी रविवार (ता. 12) पुणे मेट्रोच्या (Pune Metro) वेळेत बदल करण्यात आला आहे. यादिवशी मेट्रो सकाळी 6 वाजतापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंतच धावेल. तर सोमवारपासून मेट्रो नियोजित विळेनुसार सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत धावेल.

Pune Metro

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 'मेट्रो'च्या वेळेत बदल

पुणे : लक्ष्मीपूजनाच्या (Lakshmi Puja) दिवशी रविवार (ता. 12) पुणे मेट्रोच्या (Pune Metro) वेळेत बदल करण्यात आला आहे. यादिवशी मेट्रो सकाळी 6 वाजतापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंतच धावेल. तर सोमवारपासून मेट्रो नियोजित विळेनुसार सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत धावेल. मेट्रो प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, पुणे मेट्रो प्रवासाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी 1 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्याच्या दोन विस्तारित मेट्रो मार्गांचं उद्घाटन पार पडले होते. यामध्ये ‘वनाज ते रुबी हॉल’ आणि ‘सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मुख्यालय’ या मर्गांचा समावेश होता. या विस्तारित मार्गांमुळं पुणेकरांचा प्रवास अधिक सुसह्य झाला आहे.

यापूर्वी वनाझ ते गरवारे कॉलेज या मार्गाचे आणि पिंपरी ते फुगेवाडी या मार्गाचे उद्घाटन वर्षभरापूर्वी पंतप्रधान यांच्या हस्ते झाले होते. यामध्ये वनाज ते सिव्हिल कोर्ट हा 8 किमीचा मार्ग आहे. तर प्रवासाला 22 मिनिटे लागतात. तर पिंपरी ते सिव्हील कोर्ट हा 25 किमीचा प्रवास आहे.

तिकीट दर काय आहेत ?

वनाज ते रुबी हॉल – 25 रुपये

वनाझ ते पुणे महापालिका – 20

रुबी हॉल ते पिंपरी – 30

रुबी हॉल ते शिवाजी नगर – 15

पिंपरी ते सिव्हील कोर्ट – 30

वनाज ते रेल्वे स्टेशन – 25

रुबी हॉल ते डेक्कन – 25

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest