टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलचे ३०० विद्यार्थी एकत्रपणे थेट प्रक्षेपण
भारत तिसऱ्या चंद्र मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. आज चांद्रयान-3 चे प्रक्षेपण दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी होणार आहे. आज भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोसाठी (ISRO) महत्त्वाचा दिवस आहे. चार वर्षानंतर इस्रो पुन्हा एकदा महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. या चांद्रयान ३ चे थेट प्रेक्षेपण पुण्यातील टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलचे ३०० विद्यार्थी एकत्रपणे बघणार आहेत.
टिळक रोज येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील गणेश सभागृहात विद्यार्थी एकत्रपणे प्रक्षेपण बघणार आहेत. दुपारी १ वाजून ३० मिनिटांपासून ते ३ वाजेपर्यंत हे विद्यार्थी प्रक्षेपण पाहणार आहेत. यावेळी श्री विनायक रामदासी या मोहिमेची माहिती विद्यार्थ्यांना सांगणार आहेत.
दरम्यान, आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लाँच व्हेईकल मार्क-३ (LVM-3) रॉकेटद्वारे चांद्रयान-३ प्रक्षेपित केला जाणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा भारताचा हा दुसरा प्रयत्न असेल. ही चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाल्यास चंद्रावर पाऊल ठेवणार भारत चौथा देश ठरेल. त्यामुळे भारताचेच नव्हे तर सर्व जगाचे या मोहिमेकडे लक्ष लागले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.