सुप्रिया सुळेंनी केली पाहणी
पुण्यातील चांदणी चौकात पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग असावा. कोणता रस्ता कुठे जातो याचे दिशादर्शक फलक नागरिकांना समजेल आणि संभ्रमावस्था होणार नाही असे लावावे. प्रवासी वाहतूक कुठे थांबणार, नागरिकांनी कुठे थांबायचे, याबबतचे फलकही असावेत, त्याबाबत योग्य जागा नाही. अशा अडचणींबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आम्ही पाठपुरावा करू, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे यांनी आज चांदणी चौकाचे उद्घाटन झाल्यानंतर पाहणी केली. यावेळी, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काका चव्हाण, सचिन दोडके, सायली वांजळे, विशाल तांबे, बंडू केमसे, त्रिबंक मोकाशी, सुरेश गुजर, सविता दगडे, स्वप्नील दुधाने, महादेव कोंढरे, दगडू करंजावणे, शुक्राचार्य वांजळे, कुणाल वेडे, किरण वेडे उपस्थित होते.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “चांदणी चौकाच्या कामाबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी वेळोवेळी मदत केली. माजी नगरसेवक सचिन दोडके यांचे योगदान आणि सातत्य होते. हाच रस्ता पुढे वारजे, वडगावला गेल्यावर अरुंद होतो. ही बाब त्यांनी आवर्जून सांगितली. दिल्लीत गडकरींची भेट घेतली. वारजे येथील प्रश्नाबाबत आम्ही गडकरी यांना निवेदन दिले आहे. ते प्रश्न देखील लवकरच सुटतील.”
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.