संग्रहित छायाचित्र
पुणे आणि आजूपाजूच्या परिसरात पुढील सात दिवस हलका ते अतिहलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सकाळी आणि दुपारच्या वेळेत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होताना दिसून येत आहे. त्यातच आता हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील सात दिवस पुण्यातील हवामान अंशताह ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी हलका ते अतिहलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नागपूर व चंद्रपुरमध्ये पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २१, २२ आणि २३ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.