पुणे-सोलापूर महामार्गावर बसची ट्रकला धडक
पुणे-सोलापूर महामार्गावर यवत येथील पाटस टोल नाक्यावर एसटी बसने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात बसमधील १६ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास घडला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव डेपोची बस पुण्याच्या दिशेने येत होती. पाटस टोल नाक्यावर बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस ट्रकला मागून धडकली. सुदैवाने या घटनेत एकाही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही.
घटनेची माहिती मिळाताच ३ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर जखमी प्रवाशांना कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र, दौंड उपजिल्हा रुग्णालय आणि यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.