वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता लाच प्रकरण, अभाविपचे महापालिकेसमोर तीव्र आंदोलन
स्व. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पुणेचे अधिष्ठाता आशिष बनजीनवार यांना १० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली. “घर बसा नहीं, और लुटेरे हाजीर” अशा प्रकारची घटना पुणे शहरात घडलेली आहे मागील तीन वर्षांपूर्वीच महाविद्यालय सुरू झाले व अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार सुरू फोफावत आहे. या निंदनीय घटनेच्या विरोधात कडक कारवाई करावी, याकरिता अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर निदर्शने करत तीव्र आंदोलन केले.
पुणे महापालिकेचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि तक्रारदार यांच्यात झालेले संभाषण समोर आले. या प्रकरणात महानगर पालिकेतील वैद्यकीय शिक्षण विश्वस्त असणारे आयुक्त तसेच संस्थेचे पदाधिकारी सामील असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याची माहिती लाचलुचपत विरोधी पथकाने केलेल्या तपासातून स्पष्ट केली. यातील मुख्य आरोपी व संबंधित महाविद्यालयाचे डीन. आशिष बनजीनवार यांना या प्रकरणात पोलीसांनी अटक केली आहे. पण, “जो दिखा, वही चोर” असे न होता, या विषयात प्रशासनाने सखोल चौकशी करावी. लाच घेऊन वैद्यकीय प्रवेश करणे असे भ्रष्ट कार्य नक्कीच फक्त एका आरोपीचे नसावे, यात इतरही पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी सामिल असतील का? असा प्रश्न अभाविप कार्यकर्त्यांनी सर्वांसमोर मांडला. यामुळे, याविषयात प्रशासनाने सखोल चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी अभाविप ने या आंदोलनात केली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यावेळी बोलले की, “गाव बसा नहीं, और लुटेरे हाजीर अशी गत या ठिकाणी झाली आहे. विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. परंतु काही लाचखोर आधिकारी पैशांसाठी वैद्यकीय क्षेत्रातील जागेत भ्रष्टाचार करून त्या जागा विकतात. हा विद्यार्थ्यांवर होणारा अतिशय निंदनीय अन्याय आहे. अशा भ्रष्ट कृत्यांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा. तसेच संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करावी, व यात इतरही कोणी अधिकारी सामिल आहे का? हे तपासून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करावा.
महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे, त्यामुळे राज्य शासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने CET Cell ला चुकीची माहिती पाठवून दिशाभूल केली आहे व जागा कमी आहेत असे विद्यार्थ्याना सांगितले आहे. त्यामुळे यामध्ये संस्थाचालकांचे हित शासन स्तरावर नेमक कोण जोपासत आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे. यावेळी महानगर सहमंत्री तुषार काहूर, जिल्हा संयोजक मंदार लडकत, नगर मंत्री जयेश कोळी, सई थोपटे इत्यादी कार्यकर्ते व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.