सिंहगड रोड, डेक्कन आणि येरवड्यातील वाहतूकीत मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर...

पुणे शहरातील सिंहगड रोड वाहतूक विभागअंतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता काही ठिकाणी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येत असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 19 Aug 2023
  • 10:23 am
traffic : सिंहगड रोड, डेक्कन आणि येरवड्यातील वाहतूकीत मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर...

सिंहगड रोड, डेक्कन आणि येरवड्यातील वाहतूकीत मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर...

तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आले बदल

पुणे शहरातील सिंहगड रोड वाहतूक विभागअंतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता काही ठिकाणी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येत असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

स्वारगेटकडून वडगाव पूल वीर बाजी पासलकर चौकाकडे येणारी वाहतूक सिंहगड रस्त्याने गणेशमळा सिग्नल येथे डावीकडे वळून जनता वसाहत कॅनॉल रस्त्याने कै. मिसाळ उद्यान (कॅनॉल जंक्शन) येथे डावीकडे वळवून कॅनॉलच्या उजव्या बाजूने आनंदविहार रस्त्याने तुकाईनगर चौकापर्यंत एकेरी करण्यात आली आहे.

वडगाव पूल (वीर बाजी पासलकर) चौकाकडून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक सिंहगड रस्ता क्षेत्रीय  कार्यालय चौकातून डावीकडे वळून  लंडन पूल चौक ते कै. मिसाळ उद्यान (कॅनॉल जंक्शन) चौकातून डावीकडे वळून विश्रांतीनगर चौकापर्यंत एकेरी वाहतूक करण्यात येत असून कै. मिसाळ उद्यान (कॅनॉल जंक्शन) कडून येणारी वाहने (कॅनॉलच्या डाव्या बाजूने) जाण्यास बंदी करण्यात आली आहे.

दोन्ही कॅनॉल रस्ते जोडणाऱ्या लंडन पुलावरून हिंगणे ते महादेवनगरकडे जाण्याकरीता चारचाकी वाहनांना बंदी करण्यात येत असून फक्त दुचाकी वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. जनता वसाहत ते सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय फन टाईम थिएटर पर्यंत कॅनॉल रस्त्यावर जड वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. स्वारगेटकडून वडगाव पूलाकडे (वीर बाजी पासलकर चौक) येण्याकरीता व वडगाव पूलाकडून स्वारगेटकडे जाण्याकरीता (कॅनॉल रस्ता) पर्यायी रस्ता उपलब्ध असल्याने वाहन चालकांची व नागरिकांची गैरसोय होणार नाही.

गोयलगंगा चौकाकडून सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे जाताना गोयलगंगा चौक ते आय.सी.आय.सी.आय. बँकेपर्यंत (दुभाजक संपेपर्यंत) रस्त्याच्या दोन्ही बाजूला ५० मीटर पर्यंत नो पार्किंग क्षेत्र तयार करण्यात येत आहे. गोयलगंगा चौक ते आय.सी.आय.सी.आय. बँक ते अमृतगंगा सोसायटी गेट नं. ४ (शोरबा हॉटेल) पर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूला फक्त दुचाकी वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच रस्त्याच्या उजव्या बाजूस दुभाजक संपल्यानंतर मनपा प्रस्तावित नाट्यगृह ते अतिथी हॉटेलपर्यंत फक्त चारचाकी वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

येरवडा वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल

पुणे शहरातील येरवडा वाहतूक विभागांतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन ॲन्टी करप्शन शाखा कार्यालय व निवासस्थानाच्या समोरील मुख्य रस्त्यावर म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून डावीकडे संरक्षण भिंतीच्यालगत १०० मीटर अंतरापर्यंत व सीबीआय ॲन्टी करप्शन शाखा कार्यालयाच्या डावीकडील संरक्षण भिंती लगत मुख्य रस्त्यापासून म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ५०  मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग घोषित करण्यात आले आहे.

डेक्कन वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल

डेक्कन येथील रसशाळा चौकाकडून स्वातंत्र्य चौकाकडे जाताना बँक ऑफ महाराष्ट्रसमोर १० मीटर, भाग्यश्री ज्वेलर्स ते चैतन्य नगरी सोसायटी १५ मीटर, युनियन बँक ते स्वप्न नगरी सोसायटी २० मीटर चारचाकी पार्किंग करण्यात आले आहे. तर सिद्धेश्वर मेडीकल ते कोहिनूर वॉईन्सपर्यंत १५ मीटर आणि गणेश चेंबर, रेबन शोरुम ते अमर हार्डवेअर पर्यंत १५ मीटर दुचाकी पार्किंग करण्यात आले आहे.

स्वातंत्र्य चौक ते रसशाळा चौकाकडे जाताना कल्याण ज्वेलर्सशेजारील धनश्री ग्लास दुकान ते गो- कलर्स दुकानपर्यंत ५ मीटर दुचाकी पार्किंग करण्यात आले आहे. जगन्नाथ तरटे मार्गाशेजारील ओपन हाऊस, सारथी हॉटेल ते प्राईम फर्निचर शोरुम पर्यंत २५ मीटर दुचाकी व २५ मीटर चारचाकी पार्किंग करण्यात आले आहे. भोडे कॉलनी लेन ते कचरे पथ १० मीटर दुचाकी व १० मीटर चारचाकी पार्किंग करण्यात आले आहे, असे पुणे शहर वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest