येरवडा कारागृहात कैद्यांसाठी होणार भजन स्पर्धा

राज्यातील कैद्यांसाठी पुण्यातील कारागृहात भजन आणि अभंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात १३ जून रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे. भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 8 Jun 2023
  • 04:27 pm
 Yerawada Jail : येरवडा कारागृहात कैद्यांसाठी होणार भजन स्पर्धा

येरवडा कारागृहात कैद्यांसाठी होणार भजन स्पर्धा

राज्यातील २९ कारागृहातील कैदी स्पर्धेत होणार सहभागी

राज्यातील कैद्यांसाठी पुण्यातील कारागृहात भजन आणि अभंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात १३ जून रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे. भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. अमिताभ गुप्ता म्हणाले की, येरवडा कारागृहात १३ जून रोजी भजन-अभंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील सुमारे २९ कारागृहातील कैदी या भजन स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

यात प्रामुख्याने कोल्हापूर, तळोजा, अमरावती, पुणे, नागपूर आणि नाशिक कारागृहातील कैदी सहभागी होणार आहेत. तसेच बीड, वर्धा, अलिबाग आणि ठाणे कारागृहातील कैद्यांचा सहभाग असणार आहे. त्यांनाही या स्पर्धेनंतर पारितोषिकांचे वितरण केले जाणार आहे. दरम्यान, राज्यातील शरद क्रीडा व सांस्कृतिक संस्थेसह कारागृह विभागातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest