वठवृक्ष
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचा भाग असलेल्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खडकी भागात रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. या रस्त्यावर दुतर्फा असणारे वडाचे वृक्ष पांथस्थांचे आल्हाददायक छत बनले होते. रुंदीकरणासाठी सव्वाशे वर्षांहून अधिक जुन्या असणाऱ्या ब्रिटिशकालीन शेकडो वडाच्या झाडांची आता कत्तल झाली आहे. धोरणानुसार या वृक्षांचे शास्त्रीय पद्धतीने पुनर्रोपण व्हायला हवे. झाडे लावा, झाडे जगवा असे सरकार उठ-सूट सांगत असले तरी शतकाहून अधिक पावसाळे पाहिलेले हे वटवृक्ष आता ‘वठ’वृक्षच ठरलेत. विदारक भविष्याची नांदी सांगणारी ही परिस्थिती टिपली आहे सीविक मिररचे छायावृत्तकार तन्मय ठोंबरे यांनी.