प्रवाशांनो लक्ष द्या, पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रविवारी रद्द

रविवारी (दि. २०) पुणे – मुंबई – पुणे इंटरसिटी, पुणे – मुंबई – पुणे डेक्कन, पुणे –मुंबई –पुणे प्रगती, मुंबई –कोल्हापुर –मुंबई कोयना एक्सप्रेस, यासह शिवाजीनगर-तळेगाव, पुणे-लोणावळा या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 19 Aug 2023
  • 11:24 am
trains  : प्रवाशांनो लक्ष द्या, पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रविवारी रद्द

प्रवाशांनो लक्ष द्या, पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रविवारी रद्द

ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी रेल्वे राहणार बंद

पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. चिंचवड ते खडकी रेल्वे स्थानकादरम्यान ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे, रविवारी (दि. २०) पुणे – मुंबई – पुणे इंटरसिटी, पुणे – मुंबई – पुणे डेक्कन, पुणे –मुंबई –पुणे प्रगती, मुंबई –कोल्हापुर –मुंबई कोयना एक्सप्रेस, यासह शिवाजीनगर-तळेगाव, पुणे-लोणावळा या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सिग्लन यंत्रणेचे काम करण्यात येणार असल्याने लोणावळ्यावरून पुणे आणि शिवाजीनगरला सुटणाऱ्या काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे – जयपूर एक्सप्रेस पुण्यातून सायंकाळी ५.३० वाजता सुटण्याऐवजी ५.४५ वाजता सुटेल. दौंड – इंदौर एक्सप्रेस दौंडवरून दुपारी २ ऐवजी सायंकाळी ६ वाजता सुटेल. रविवारी सुटणाऱ्या मुंबई – चेन्नई, लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा पोर्ट, मुंबई – भुवनेश्वर, मुंबई –हैदराबाद आणि शनिवारी सुटणाऱ्या त्रिवेंद्रम – मुंबई, बंगळुरु – मुंबई, ग्वाल्हेर – दौंड एक्स्प्रेस या गाड्यांना उशीर होणार आहे.

पुणे- दौंड रेल्वे मार्गावरील हडपसर ते लोणी स्थानकांच्या दरम्यान रविवारी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे रविवारी पुणे – दौंड – पुणे डेमू रद्द राहील. पुणे – राणी कमलापती हमसफर एक्स्प्रेस पुण्यातून दुपारी ३.१५ ऐवजी सायंकाळी ५ वाजता सुटेल. शनिवारी हैदराबादमधून सुटणारी हैदराबाद – हडपसर एक्सप्रेस दौंडपर्यंत धावेल. रविवारी हडपसरमधून सुटणारी हडपसर- हैदराबाद एक्सप्रेस ही गाडी हडपसरऐवजी दौंडमधून सोडण्यात येईल ही गाडी हडपसर – दौंड- हडपसर दरम्यान रद्द राहील. शनिवारी चेन्नईतून सुटणारी चेन्नई- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी दौंड – मनमाड – इगतपुरी या बदललेल्या मार्गाने चालविण्यात येईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest