फिटनेस प्रमाणपत्रा अभावी ‘पुण्यदशम्’ सेवा खंडित
पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून पुणेकरांसाठी ‘पुण्यदशम्’ गाड्या सुरू कऱण्यात आल्या आहेत. मात्र, या गाड्यांना फिटनेस प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे सुमारे ५० गाड्या बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, आता या गाड्या टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जातील, असा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
शहरातील पेठांसह मध्यवर्ती भागातील अरुंद रस्ते लक्षात घेऊन पीएमपीकडून पुण्यदशम् सेवा सुरू करण्यात आली आहे. दहा रुपयांत ही सेवा दिली जात आहे. त्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात ५० गाड्या आहेत. या गाड्यांचे फिटनेस प्रमाणपत्र ८ जुलै रोजी संपले आहे. त्यामुळे या गाड्या प्रवासी सेवेत नव्हत्या. त्यापैकी शनिवारी (१५ जुलै) नऊ गाड्यांना प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे सध्या केवळ नऊ गाड्या संचलनात आहेत.
पीएमपीएमएलच्या स्वारगेट डेपो मधून संचलनात असलेल्या ५० पुण्यदशम बसेस, ज्या फिटनेस प्रमाणपत्रअभावी बंद होत्या त्या आता टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता पुण्यदशम बसेसच्या जागी साध्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे, तरी प्रवाशांना काही… pic.twitter.com/813WY08uwb
— Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (@PMPMLPune) July 18, 2023
दरम्यान, उर्वरित गाड्यांना देखील लवकरच फिटनेस प्रमाणपत्र मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित गाड्या टप्प्याटप्प्याने सुरू होतील, असा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे. गाड्या बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता पुण्यदशम बसेसच्या जागी साध्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे, तरी प्रवाशांना काही प्रमाणात होणाऱ्या गैरसोयी बद्दल पीएमपीएमएलकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.