Ganeshotsav parking Arrangement : पुणे शहरात गणेशोत्सवात 'या' ठिकाणी पार्किंगची व्यवस्था
पुण्यात गणेशोत्सवास काल मंगळवार (दि. 19) पासून मोठ्या जल्लोशात सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवादरम्यान मोठ्या संख्येने नागरिक पुण्यात येत असतात त्यामुळे शहरातील मध्यवस्तीत मोठी वाहतूक कोंडी याकाळात बघायला मिळते. दरम्यान वाहतूक विभागाकडून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात गणेशोत्सवात अनेक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था (Ganeshotsav parking Arrangement) करण्यात आली आहे. शहरात २६ ठिकाणी पार्किंग स्टँड उभारण्यात आले असून २७ सप्टेंबर पर्यंत ठरवून दिलेल्या ठिकाणीच वाहने पार्किंग करता येणार आहेत.
दुचाकीसाठी वाहनतळ -
- न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग
- देसाई महाविद्यालय (पोलिसांच्या वाहनांसाठी)
- गोगटे प्रशाला
- स.प. महाविद्यालय
- शिवाजी मराठा विद्यालय
- नातूबाग
- सारसबाग, पेशवे पार्क
- हरजीवन रुग्णालयासमोर, सावरकर चौक
- पाटील प्लाझा पार्किंग
- मित्रमंडळ सभागृह
- पर्वती ते दांडेकर पूल
- दांडेकर पूल ते गणेश मळा
- गणेश मळा ते राजाराम पूल
- विमलाबाई गरवारे हायस्कूल
- आपटे प्रशाला
- मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय
- एसएसपीएमएस महाविद्यालय
दुचाकी आणि मोटारींसाठी वाहनतळ-
- शिवाजी आखाडा वाहनतळ
- हमालवाडा, पत्र्या मारुती चौकाजवळ
- नदीपात्रालगत
- पीएमपी मैदान, पूरम चौकाजवळ
- नीलायम टॉकीज
- आबासाहेब गरवारे महाविद्यालय
- संजीवन वैद्यकीय महाविद्यालय
- फर्ग्युसन महाविद्यालय
- जैन वसतिगृह, बीएमसीसी रस्ता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.