संग्रहित छायाचित्र
पुणे मेट्रोच्या (Pune Metro) दोन नव्या मार्गांना मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. पुण्यात खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग या दोन नव्या मेट्रो मार्गांना महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत आज मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळेपुणे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या टप्प्यातील खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला व नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग या प्रकल्पांचे महत्त्व लक्षात घेऊन या मेट्रो मार्गांना मान्यता देण्यात आली. या मार्गिंकांची एकूण लांबी ३१.६३ कि.मी. असून २८ उन्नत स्थानके आहेत. यासाठी ९ हजार ८१७ कोटी १९लाख रुपये खर्चाच्या प्रकल्पास महामेट्रोमार्फत अंमलबजावणी करण्यास देखील मान्यता देण्यात आली.
दरम्यान पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे केद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानले आहेत.
या दोन नवीन मार्गांना मिळाली मंजूरी
१) खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी
२) नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग