Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी कुठल्याही प्रकारचे चुकीचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही ; धीरज घाटे

सावित्रीबाई फुले विद्यापीठातील २ क्रमांकाच्या वसतिगृहाच्या भिंतीवर आक्षेपार्ह शब्दात टिपणी करण्यात आली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Fri, 3 Nov 2023
  • 05:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी कुठल्याही प्रकारचे चुकीचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही ; धीरज घाटे

पुणे: सावित्रीबाई फुले विद्यापीठातील २ क्रमांकाच्या वसतिगृहाच्या भिंतीवर आक्षेपार्ह शब्दात टिपणी करण्यात आली होती.  त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष धिरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली विद्यपीठात तीव्र आंदोलन करून कुलगुरूंना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की, ''सावित्रीबाई फुले विद्यापीठातील घटना ही पुणे शहराच्या दृष्टीने लज्जास्पद घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जगात आदर आहे. असे असताना काही लाल माकडांनी पंतप्रधानांविषयी असे उदगार काढणे हे म्हणजे करंटेपणाचे लक्षण आहे. मुळामध्ये जे विद्यार्थी विद्यपीठाशी संबंधित नाहीत अशा विद्यार्थ्यांवर विद्यापीठाने कारवाई करणे अपेक्षित आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे  जे एन यु होते आहे की काय असा प्रश्न पडत आहे.''

पंतप्रधान मोदी यांच्याविषयी कुठल्याही प्रकारचे चुकीचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही, जशास तसे उत्तर देण्यात येईल' असा इशाराही घाटे यांनी यावेळी बोलताना दिला.  

या आंदोलनाला शहराध्यक्ष घाटे, लोकसभा संयोजक श्रीनाथ भिमाले, हेमंत रासने, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस सुशील मेंगडे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, वर्षा डहाळे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, राघवेंद्र मानकर, राजू शिळीमकर, राहूल भंडारे, वर्षा तापकीर, महिला आघाडी अध्यक्षा हर्षदा फरांदे, युवा मोर्चा अध्यक्ष करण मिसाळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest