पुणे-नगर रस्त्यावर महापालिकेची अतिक्रमण विरोधी धडक कारवाई
पुणे : महापालिकडून शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण (PMC News) हटविण्याची धडक करावाई करण्यात आहे. या कारवाईनुसार नगर (Pune News) महामार्गावरील बेकायदा बांधकामावर पालिकेने हातोडा चालवल रस्ता मोकळा केला.
पुणे महानगरपालिकेने शहरातील १५ प्रमुख रस्ते व्हीआयपी रस्ते म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या रस्त्यावर कोणत्याही प्रकारते अतिक्रमण होणार नाही. तसेच रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे. त्यानुसार या रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहिम महापालिकेकडून राबविण्यात येत आहे. आज (सोमवारी) नगर रोडवरील बेकायदा बांधकामे पाडण्यात आली. तसेच रस्त्यांवर उभी केलेल्या बेकायदा हातगाड्या देखील उचलण्यात आल्या. रेड्डी फॅमिली रेस्टो आणि बार, अल नायब आणि बस स्टँडजवळील बांधकामे आज सकाळी हटवण्यात आली.
विमानतळ आणि रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. या रस्त्यांवरील पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दुभाजक बसवून रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. रस्त्यालगतच्या भिंतींनाही फेस लिफ्ट मिळणार आहे. दुभाजकांनाही पुन्हा रंगरंगोटी करण्यात येणार आहे. काही ठिकाणी चौकांची पुनर्बांधणी केली जाणार आहे.
अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, “मिशन 15 रोडमधील रस्त्यांची निवड आदर्श आहे. नगर रस्त्याचे बेकायदेशीर बांधकाम आज पाडण्यात आले. पालिकेचे रस्ते अतिक्रमणमुक्त करणे हे ध्येय आहे.”