मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा ब्लॉक, उद्या दोन तास राहणार बंद

यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती (एक्सप्रेसवे) मार्गावरील पुण्याच्या दिशेने येणारी लेन (बाजू) उद्या दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. लोणावळा एक्झिट येथे दुरूस्तीतीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे, उद्या दुपारी दोन तास रस्ता बंद राहणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 31 Aug 2023
  • 05:02 pm
Mumbai-Pune expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा ब्लॉक, उद्या दोन तास राहणार बंद

संग्रहित छायाचित्र

यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती (एक्सप्रेसवे) मार्गावरील पुण्याच्या दिशेने येणारी लेन (बाजू) उद्या दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. लोणावळा एक्झिट येथे दुरूस्तीतीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे, उद्या दुपारी दोन तास रस्ता बंद राहणार आहे.

जुलै महिन्यात पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर दरड कोसळल्याने वाहतूक बंद ठेवावी लागली होती. त्यानंतर प्रशासनाने रस्त्यारुन दरड हटवण्यासाठी वाहतूक बंद ठेवली होती. त्यावेळी सुरुवातीला दोन तास वाहतूक बंद ठेवण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र वाहतूक पूर्ववत होण्यासाठी अधिक वेळ लागला होता.

आता पुन्हा एकदा मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील पुण्याकडे जाणारी मार्गिका दोन तास बंद राहणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. यामुळे मुंबई पुणे जुन्या महामार्गावर पुणे ग्रामीण पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest