नवले पुलावर पुन्हा अपघात, ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक झाला पलटी
पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाल्याचे समोर आले आहे. कात्रजकडून येणाऱ्या एका ट्रॅकचा नवले पूलाजवळ अपघात झाला आहे. सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्याच पलटी झाला. या अपघातात एक जण जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंट वाहून नेणारा ट्रक कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने जात होते. नवले पुलाजवळ येताच ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक पलटी झाला. या दरम्यान, ट्रकने सिग्नलवर थांबलेला वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये एक चार चाकी तसेच एका दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. तात्काळ वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहचले असून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर क्रेनच्या साह्याने पलटी झाले ट्रक बाजूला काढण्याचा काम सुरु आहे. आता वाहतूक सुरळीत झाली असून काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.