पुणे शहरातील हवेची गुणवत्ता खालावली...
पुण्यातील हवा गुणवत्ता खालवल्याचे चित्र समोर आले आहे. पुण्यातील हवेची श्रेणी ही खराब या अवस्थेत गेली आहे. पुण्यात हवेतील अतिसूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण पार्टिक्युलेट मॅटर २.४ पेक्षा अधिक आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक १४६ वर, तर पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक १७८ इतकी आहे.
मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक सामान्य स्थिती असला तरीही मागील काही दिवसात हवेची गुणवत्ता प्रचंड खालवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ११० वर गेली आङे. मुंबई आणि पुण्यात पीएम २.५ कणांची मात्रा अधिक असल्याची सफरची नोंद झाली. पीएम २.५ धुलिकण कार्सिनोजेनिक असल्याने श्वसनासाठी घातक असल्याची माहीती आहे.
पुण्यातील लोहगावमधील हवा गुणवत्ता निर्देशांक ३०१ वर तर आळंदीत एक्यूआय २३२ वर आहे. हिवाळ्यात पूर्वेकडून वाहणारे वारे, सोबतच वाऱ्यांचा वेग देखील कमी असल्याने मुंबईसह पुण्यातील हवा गुणवत्ता खराब आहे. त्यात वाढलेली वाहन संख्या यामुळे देखील प्रदूषणात मोठी वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. हवेच्या प्रदूषणामुळे दमा, टीबी, केंसर ,सर्दी, खोकला, डोळे, त्वचा, आणि हृदय रोगांच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.