प्रशासन सज्ज, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये घेण्यात आले मॉक ड्रिल
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील दोन ते तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील वाहणाऱ्या नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. पूर परिस्थितीसाठी पुणे प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी महापालिकेकडून खेडमध्ये गुरूवारी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.
इर्शाळवाडीमध्ये मोठी दुर्घटना घडली. अनेकांचे संसार उद्वस्त झाले. मोठी जीवितहानी झाली. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अशी कोणत्याही प्रकारची घटना घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे जिल्हा आरोग्य विभाग आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी पूर आणि भूस्खलनाच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी गुरुवारी मॉक ड्रिल आयोजित केले होते.
आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व सरकारी विभाग त्यांची तयारी तपासण्यासाठी या सरावात सहभागी झाले होते. भीमा-भामा नदी संगमावरील शेल पिंपळगाव गावात पूरस्थिती हाताळण्याची तयारी तपासण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आले. ड्रिल दरम्यान एका व्यक्तीची सुटका करण्यात आली आणि त्याला कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन देण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून डमी रुग्णाला शेल पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा असल्याने मॉक ड्रिल घेण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.