परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई; शिक्षण मंडळाचा इशारा

शालेय शुल्क न भरल्याचे कारण देत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये. या संदर्भात लेखी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव एम. एस. देसले यांनी दिला आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

लेखी तक्रार करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

शालेय शुल्क न भरल्याचे कारण देत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये. या संदर्भात लेखी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव एम. एस. देसले यांनी दिला आहे.

सध्या शाळा-महाविद्यालयांमध्ये राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यात येत आहेत. नाशिक विभागातील स्वयंअर्थसाहाय्यित शाळा तसेच इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा, अनुदानित व विनाअनुदानित सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये काही विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज अद्याप भरलेले नाहीत.

शालेय शुल्क न भरल्याने शाळा व्यवस्थापनाकडून परीक्षा अर्ज भरले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. शालेय शुल्काच्या नावाखाली जर विद्यार्थ्यांची अडवणूक करण्यात येत असेल, तसेच विद्यार्थी व पालकांचे मानसिक खच्चीकरण करण्यात येत असेल तर संबंधित शाळांवर कारवाई करण्याचा इशारा देसले यांनी दिला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest