विधी महाविद्यालय जवळील अनाधिकृत हॉटेलवर पुन्हा कारवाई
पुण्यातील भांडारकर आणि विधी महाविद्यालय येथिल जंक्शनवर परिसरात असलेल्या अनाधिकृत बांधकामावर महापालिकेच्या वतीने शुक्रवारी कारवाई करण्यात आली आहे. यावेळी हॉटेल सब्रोसवर बांधकाम विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. यात सुमारे २ हजार ५०० चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
या हॉटेलवर यापुर्वी ३ वेळा कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही पुन्हा विनापरवाना बांधकाम केले जात होते. यामुळे मालक आणि चालक यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना कळविण्यात आले आहे. पुढील दोन दिवसात गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्याचप्रमाणे हॉटेलचा मद्य परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे करण्यात आली आहे. याबाबत महापालिकेच्या उपअभियंता सुनील कदम यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, यावेळी सेनापती बापट रस्त्यावरील वेताळ बाबा चौक जवळील नव्याने बांधण्यात येत असलेली १०० फुट × ५० फुट मापाची शेड पाडण्यात आली. या कारवाईत जेसीबी, गॅस कटर, १० बिगारी इ.चा वापर करण्यात आला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.