वाहनांवर कारवाई
पुण्यातील खेड शिवापूर ते नवले पूलदरम्यान विविध वाहतूक नियमांचे उल्लंघनाबद्दल दररोज सरासरी ३०० वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली. ही बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देखमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बोलताना विजयकुमार मगर म्हणाले की, “यापुर्वी झालेल्या बैठकीत पुणे-बंगळुरू महामार्गावरील कात्रज नवीन बोगद्याच्या अलिकडे जांभूळवाडीनजीक पोलीस चौकी स्थापन करण्यात आली आहे. या रस्त्यावर २४ तास पोलीस मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून १० अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पोलीस वाहनांद्वारे गस्त घालण्यात येत असून त्याचा चांगला परिणाम झाला आहे.”
यावेळी निर्देश देताना जिल्हाधिकारी राजेश देशमुख म्हणाले की, “वेगमर्यादा तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना रोखून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ग्रामीण पोलीस आणि शहर वाहतूक विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे इंटरसेप्टर वाहनासाठीचा प्रस्ताव तात्काळ द्यावा. या रस्त्यावर प्रत्येक मार्गिकेमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले असून ते पोलीस विभागाच्या सॉफ्टवेअरशी जोडावेत, जेणेकरुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करता येईल.”
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.