अभाविपकडून सागरेश्वर मंदिरात चांद्रयान-३ मोहीम यशस्वी होण्यासाठी दुग्धाभिषेक
भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. चंद्रावर भारताचे चांद्रयान-३ यान आज लँडिग करणार आहे. इस्रोचे बहुप्रतिक्षित मिशन चांद्रयान-३ आज म्हणजेच २३ ऑगस्टच्या संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. प्रक्षेपणानंतर २२ दिवसांनी चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल. यासह भारत इतिहास रचणार असून असे करणारा जगातील चौथा देश ठरणार आहे. एवढेच नाही तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे.
दरम्यान, चांद्रयान-3 ची मोहिम यशस्वी होण्यासाठी देशभरातील नागरिक प्रार्थना करत आहे. चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगसाठी दुग्धाभिषेक व महाआरती करण्यात आली. चांद्रयान सुरक्षितपणे चंद्रावर उतरावं आणि मोहीम यशस्वी व्हावी यासाठी अभाविप कडेगांव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शंभू महादेवला साकडे घातले.
यावेळी अभाविप कडेगाव तालुका संयोजक- प्रथमेश पाटील, कडेगाव तालुका सहसंयोजक- राहुल सूर्यवंशी, वैभव सुतार, संग्राम मोहिते, गिरीधर सुतार, मंदार वर्तक, अक्षय होनमाने उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.