वानवडीतील ज्वेलरीच्या दुकानाला भीषण आग, तुळशीबागेतील ट्रॉन्सफॉर्मर पेटला

पुण्यातील गर्दीचे ठिकाण असलेल्या तुळशीबागेत आग लागली आहे. तर दुसरीकडे वानवडी येथे पियुष ज्वेलर्स या दुकानात आग लागली आहे. घटनेची माहिती मिळाताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंञण मिळविण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 16 Aug 2023
  • 06:14 pm
Wanwadi fire : वानवडीतील ज्वेलरीच्या दुकानाला भीषण आग, तुळशीबागेतील ट्रॉन्सफॉर्मर पेटला

वानवडीतील ज्वेलरीच्या दुकानाला भीषण आग, तुळशीबागेतील ट्रॉन्सफॉर्मर पेटला

पुण्यातील गर्दीचे ठिकाण असलेल्या तुळशीबागेत आग लागली आहे. तर दुसरीकडे वानवडी येथे पियुष ज्वेलर्स या दुकानात आग लागली आहे. घटनेची माहिती मिळाताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंञण मिळविण्यात आले आहे. सुदैवाने या दोन्ही घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुण्यातील वानवडीतील परमार पार्क सोसायची येथील सोळंके ज्वेलर्स या दुकानाला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळाताच कोंढवा खुर्द अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले.

तर दुसऱ्या घटनेत गर्दीचे ठिकाण असलेल्या तुळशीबागेत एका इलेक्ट्रिक ट्रॉन्सफॉर्मरला आग लागली आहे. पहाचेच्या सुमारास आग लागल्याने कोणतीही जीवित किंवा जखमी झाले नाही. वेळीच माहिती मिळाल्याने अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण मिळविण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest