धायरी-नांदेड रस्त्यालगत बारंगाने मळा येथील कारखान्याला भीषण आग
धायरी भागातील -नांदेड रस्त्यालगत बारंगाने मळा येथे असलेल्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. यावेळी अग्निशमन दलाची ५ वाहने आणि पाण्याचे ३ टॅंकर घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून आगी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आज शनिवारी सव्वा बाराच्या सुमारास लागलेली ही आग अग्निशमन दलाकडून दुपारी दीडच्या सुमारास पुर्णपणे विझवण्यात आली. आगीचे कारण अद्याप समोर आले नसून सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र आगीत कारखान्यातील साहित्य, कच्चा माल जळला. कारखान्याला सुट्टी असल्याने गंभीर दुर्घटना टळली. आगीत तीन छोट्या कारखाण्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.