मोठा अनर्थ टळला, मात्र मेट्रोचा भोंगळ कारभार उघड
पुण्यात एक मेट्रो रुळावर बंद पडली होती. मात्र असे असताना दुसरी मेट्रो रुळावर सोडण्यात आल्याने भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. यावेळी धोक्याची घंटा वाजवत दोन्ही ट्रेन समोरासमोर थांबल्या. गुरुवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.
शिवाजीनगर मेट्रो स्थानक जवळ गुरुवारी दोन्ही मेट्रोमुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश निकम यांनी या घटनेचे चित्रीकरण केले आहे. बंद पडलेल्या मेट्रो रुळावर दुसरी मेट्रो सोडल्याने भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाल्याने धोक्याची घंटा वाजवत ट्रेन समोरा समोर थांबल्या.
मात्र, धोकादायक स्थिती निर्माण होऊन देखील मेट्रोचे व्यवस्थापक म्हणतात, ही घटना फार गंभीर नाही, असं घडू शकतं, सेफ डिस्टनसवर मेट्रो थांबतात. कंट्रोल आणि कमांड सिस्टीम चांगली आहे. पण मेट्रो बंद पडते ती सुरू न करता दुसरी मेट्रो सोडली जाते अशा वेळी कंट्रोल सेंटर काय करत होतं ? मेट्रो एवढ्या लवकर बंद पडू लागल्या आहेत तर यंत्रणेचं काय ? असे प्रश्न आता निर्माण होत आहेत.
मेट्रोने काय दिले स्पष्टीकरण ?
मेट्रोचा हा व्हिडिओ खालून घेतला असल्या कारणाने आपणास दोन्ही मेट्रो एकच मार्गावर आल्याचे भासत आहे. पण या दोन्ही ट्रेन दोन वेगळ्या मार्गावर असून थांबलेली ट्रेन मधल्या मर्गिकेवर आहे. आपण व्हिडिओ नीट बघितल्यावर हे लक्ष्यात येईल की, हॉर्न वाजवणाऱ्या मेट्रोची ट्रायल सुरू आहे. या दोन्ही मेट्रो ट्रेन मुख्य मार्गावर नसून डेपोमध्ये ये जा करण्याच्या मार्गावर आहेत. यातील एक ट्रेन डेपोमध्ये जात आहे, तर दुसरी डेपोमधून मुख्य मार्गावर येत आहे. मेट्रो प्रवास हा पूर्णपणे सुरक्षित असून मेट्रोच्या २ ट्रेन एकाच मार्गिकेवर येऊ शकतं नाहीत. पण कधी असेल झालेच तर पुणे मेट्रोमध्ये अद्ययावत यंत्रणा असून दोन्ही ट्रेन स्वतःहून एका विशिष्ठ अंतरावर एकमेकांशी संपर्क साधून उभ्या राहतात. यासाठी कोणत्याही मेट्रो कर्मचाऱ्याने कार्यवाही करण्याची वाट पहावी लागत नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.