रोहन भंसाळीची स्क्यूब इन स्पेस नासा येथे निवड
पुण्यातील रोहन भंसाळी याचे वय फक्त अकरा वर्ष इतकेच असताना देखील त्याची क्यूब इन स्पेस नासा येथे निवड झाली आहे. अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेच्या संशोधनामध्ये सहभागी होण्याची संधी रोहनला मिळाली आहे. क्यूब इन स्पेस या योजनेच्या माध्यमातून अंतराळ मोहिमांची निर्मिती करून त्यामध्ये प्रयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. अशीच संधी रोहनला मिळाली व त्याने त्या संधीचे सोने करून दाखवले.
अंतराळात जाणाऱ्या मानवी शरीरावर पडणाऱ्या किरणोत्सर्गाशी संबंधित संशोधन यामध्ये केले जाणार आहे. यामुळे अंतराळात गेलेल्या अंतराळवी यांच्या सुटच्या माध्यमातून होणारे आजार व दुष्परिणाम रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात. यामध्ये रोहनने तयार केलेल्या क्यूबमध्ये चार युव्ही सेंसॅार व तीन निवडक पदार्थ तसेच एका मायक्रोप्रोसेसरचा समावेश होता.
रोहन हा पुण्यातील विद्या वाली या शाळेत शिक्षण घेत असून सध्या सहावी या इयत्तेत शिकत आहे. तर मोठा होऊन त्याला क्रिकेटर किंवा वैज्ञानिक व्हायचे आहे, असे त्याने यावेळी सांगितले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.