Pune : बार्टीत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार बाचाबाची

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे(बार्टी) एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी पुर्व प्रशिक्षण दिले जाते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Tue, 31 Oct 2023
  • 09:33 pm

बार्टीत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार बाचाबाची

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे(बार्टी) एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी पुर्व प्रशिक्षण दिले जाते. यासाठी बार्टीने चाळणी परीक्षा घेतली होती. त्या परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला असून यादीमध्ये केवळ परीक्षा क्रमांक आणि विद्यार्थ्यांची नावे देण्यात आली होती. त्यावर विद्यार्थ्यांनी सुधारित निकाल जाहिर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बार्टीने सुधारित निकाल लावला. परंतू या निकालात गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून ही परीक्षा रद्द करुन पुन्हा घ्यावी तर पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी केली आली आहे. यावरुन मंगळवारी बार्टीत विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार बाचाबाची झाली. 

 

बार्टीने पहिल्या निकालातील पात्र यादीमध्ये केवळ परीक्षा क्रमांक आणि विद्यार्थ्यांची नावे दिली  होती. त्यामुळे कोणत्या विद्यार्थ्यांला किती गुण मिळाले तसेच आरक्षणानुसार निवड यादी जाहिर केली आहे का, याची काहीच माहिती मिळत नसल्याने निकाल लावताना बार्टीने मनमानी केली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. तसेच निवड यादी गुणांसह तसेच जात, पोट जातींचा उल्लेख करुन जाहिर करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार बार्टीने सुधारीत पात्र यादी जाहिर केली. मात्र या यादीत मागच्या वर्षी लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा लाभ दिला असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच निकालात गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. गैरप्रकार केल्याच्या आरोपातून दोन गटात वेगवेगळ्या मुद्द्यांवर बार्टीमध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यावर आता बार्टी प्रशासनाकडून नेमका काय निर्णय घेतला जाणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत बार्टीचे कोणतेही अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. तसेच बार्टीचे महासंचालक पंजाबला गेले आहेत, असे कार्यालयातून सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. बार्टीच्या स्पर्धा परीक्षा प्रमुख स्नेहल भोसले यांनी विद्यार्थ्यांना महासंचालक पंजाबमध्ये असल्यामुळे त्यांच्या सोबत चर्चा करून आपेक्षित बदल करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. असे सांगितल्याचे विद्यार्थ्यांनी सिविक मिररला सांगितले. 

 

विद्यार्थ्यांनी घेतलेले आक्षेप...

- परीक्षेमध्ये गैरप्रकार झालेला आहे. त्यामुळे निकाल रद्द करून परीक्षा पुन्हा घेण्यात यावी.

- परीक्षा रद्द करण्यात यावी पारदर्शक पध्दतीने झालेली नाही 

- परीक्षा सुरु असताना पेपर वेळेच्या आधी पूर्वसूचना न देता पेपर समाविष्ट करण्यात आले 

- गेल्या वर्षी लाभ घेतले 50 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पुन्हा लाभ घेतलेला हे दिसून येते

- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर बार्टीने उत्तरपत्रिका जाहिर कराव्यात

- परीक्षेस न बसलेल्या २० विद्यार्थ्यांची नाव यादीत आलेली आहेत

- समांतर आरक्षणाचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने लावून विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest