एड्सग्रस्तांच्या मदतीसाठी कात्रजमधील सरहद कॉलेजचा उपक्रम
एड्सग्रस्त मुलांना मदत करण्यासाठी “एक हात मदतीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुण्यातील कात्रज येथील सरहद कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स अँड सायन्स आणि इन्फंट इंडिया सामाजिक धर्मदाय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे.
या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा. अपर्णा केदारी, प्राध्यापक कोमल वनशीव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हनुमंत जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १५१ किलो धान्य, १५० किलो कपडे यांचे संकलन केले. तसेच ही सर्व मदत एड्सग्रस्त मुलांपर्यंत पोहोचवली आहे. कार्यक्रमाच्या प्रसंगी दत्ताभाऊ बारगजे आणि त्यांच्या पत्नी संध्या बारगजे यांनी संस्थेचे सामाजिक कार्य व जीवन परिचय सांगितला.
तसेच प्राचार्य हनुमंत जाधवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. हनुमंत जाधव सर सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अपर्णा केदारी व आभार प्रदर्शन डॉ. वर्षा निंबाळकर यांनी केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.