Surendra Pathare Foundatio : सुरेंद्र पठारे फाऊंडेशनकडून सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेट

खराडी, पुणे: दिवाळीच्या (Diwali) लखलखाटात आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी बऱ्याचदा अंधारात चाचपडत साजरी होते. मात्र त्यांनाही गोडधोड देऊन त्यांचीसुद्धा दिवाळी गोड व्हावी, लखलखाटात जावी यासाठी 'सुरेंद्र पठारे फाऊंडेशन'तर्फे

Surendra Pathare Foundatio

सुरेंद्र पठारे फाऊंडेशनकडून सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेट

खराडी, पुणे: दिवाळीच्या (Diwali) लखलखाटात आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी बऱ्याचदा अंधारात चाचपडत साजरी होते. मात्र त्यांनाही गोडधोड देऊन त्यांचीसुद्धा दिवाळी गोड व्हावी, लखलखाटात जावी यासाठी 'सुरेंद्र पठारे फाऊंडेशन'तर्फे (Surendra Pathare Foundatio) दरवर्षीप्रमाणे खराडी चंदननगर भागातील सफाई कर्मचारी बंधू भगिनींना कपडे व मिठाई वाटप करण्यात आले. खराडी येथे मा. आमदार बापूसाहेब पठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. 

सुरेंद्र पठारे फाऊंडेशन वर्षभर विविध समाजपयोगी उपक्रम राबवत असते. दरवर्षी दिवाळीनिमित्त सफाई कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने  कपडे व मिठाई वाटप करण्यात येते. सामाजिक बांधिलकी जपत समाजातील श्रमिक, कष्टकरी, कर्मचारी अशा कामगारांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न सुरेंद्र पठारे फाऊंडेशनकडून करण्यात येतो. 

"नागरिकांच्या आरोग्यासाठी व पुणे शहराला स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी सर्व सफाई कामगार बंधू भगिनी काम करत असतात. त्यांच्याप्रती व त्यांच्या कामाबद्दल नेहमीच आदर वाटतो. ते ज्या पद्धतीने आपली कर्तव्ये पार पाडत असतात त्याचप्रमाणे एक सुजाण नागरिक म्हणून तसेच समाजाचा घटक म्हणून आपलीही काही कर्तव्य आहेत आणि म्हणून या माध्यमातून ती कर्तव्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न नेहमी असतो", असे मत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केले. सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे सफाई कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest