चंदननगरमधील शाळेत अग्नितांडव, सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला
पुण्यातील चंदननगर येथील भाजी मार्केटमध्ये असणाऱ्या एका शाळेमध्ये मोठी आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, चंदननगर परिसरातील भाजी मार्केटमध्ये हंबीरराव मोझे शाळा आहे. या शाळेमध्ये आज दुपारी २ वाजून ४५ मिनिटाच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून येरवडा फायरगाडी व मुख्यालयातून एक वॉटर टँकर घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यामुळे आग आटोक्यात आली असून सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.
आज दहीहंडी सण साजरा होत आहे. त्यामुळे शाळेला आज सुट्टी आहे. विद्यार्थी शाळेमध्ये नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.