पुणेकरांना मोठा दिलासा, शहरातील पाणीकपातीचा निर्णय रद्द

पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मे महिन्यापासून सुरू असलेला पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. खडकवासला धऱण साखळी परिसरात पुरेसा पाऊस पडत असल्याने धरणातील पाठीसाठा वाढला आहे. त्यामुळे शहरातील पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना महापालिकेकडून नियमित पाणीपुरवठा होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 29 Jul 2023
  • 03:19 pm
Pune water supply : पुणेकरांना मोठा दिलासा, शहरातील पाणीकपातीचा निर्णय रद्द

पुणेकरांना मोठा दिलासा, शहरातील पाणीकपातीचा निर्णय रद्द

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मे महिन्यापासून सुरू असलेला पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. खडकवासला धऱण साखळी परिसरात पुरेसा पाऊस पडत असल्याने धरणातील पाठीसाठा वाढला आहे. त्यामुळे शहरातील पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना महापालिकेकडून नियमित पाणीपुरवठा होणार आहे.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्किट हाऊस येथे बैठक पार पडली. या आढावा बैठकीस महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसन्न जोशी, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा २१.६२ टीएमसी असून गतवर्षी याच कालावधीत हा साठा २१.४२ टीएमसी होता. वर्षभरात पिण्याचे पाणी व शेतीसाठी साधारण ३० टीएमसी पाण्याची आवश्यकता असते अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मे महिन्यात हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर यंदा पाऊस उशिरा येण्याची शक्यता सांगण्यात आले होते. त्यानुसार १८ मेपासून आठवड्यामधून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

तसेच जून आणि जुलैच्या मध्यापर्यंत पाऊस कमीच झाला. पण, जुलै महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत जोरदार पाऊस झाल्याने धरणसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे आता पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यात आला असून उद्यापासून सुरळीत पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest