खडकवासला धरणात ९ मुली बुडाल्या
पुण्यातील खडकवासला धरणात सकाळी पोहायला गेलेल्या नऊ मुली पाण्यात बुडाल्या होत्या. त्यातील सात मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मात्र, दोन मुलींचा मृत्यू झाला असून अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघींचे मृतहेद पाण्याबाहेर काढले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवारी) सकाळच्या सुमारास नऊ मुली गोरे बुद्रुक येथील कलमाडी फार्मच्या मागील बाजूस खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, अचानक या मुली पाण्यात बुडाल्या. यावेळी जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिक लोकांनी नऊ पैकी सात मुलींना सुखरुप पाण्याबाहेर काढले.
मात्र, दोन मुली बेपत्त झाल्या होत्या. त्यानंतर अग्निशमन पीएमआरडीएचे अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळाताच हवेली पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जवानांनी सुरू केलेल्या शोध मोहिमेत २ मुलींचे मृतदेह सापडले असून त्यांना पाण्याबाहेर काढण्यात आले आहे.