File Photo
दक्षिण भारतातील कारागिरांनी सुमारे २३ वर्षांपूर्वी साकारलेली सोन्याची साडी सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला या वर्षी परिधान केली. मंदिर प्रशासनाने दरवर्षी देवीच्या मूर्तीला तब्बल १६ किलो सोन्याची साडी परिधान केली जाते. विजयादशमीनिमित्त देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा आहे.
सुमारे ६ महिने साडी तयार करण्याचे काम सुरू होते. देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली असून तिचे वजन तब्बल १६ किलो एवढे आहे. आकर्षक नक्षीकाम करून ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रूप पाहण्याकरीता भाविकांची दरवर्षी गर्दी होते. त्यानुसार यंदाही भाविक मोठ्या संख्येने देवीचे दर्शन घेण्यासाठी आले होते.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टतर्फे वर्षातून दोनदा ही साडी नेसवली जाते. मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा आदी यावेळी उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.