बिल्डरकडून १०६ कोटींचा कथित बांधकाम घोटाळा, गुन्हा दाखल होऊनही तपास “जैसे थे”

शेतकरी कुणाल मासाळ व त्यांच्या इतर कुटुंबीयांची १०६ कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. गुन्हा दाखल करून १५ दिवस उलटलेत. मात्र, पोलीसांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे, आरोपींना अटक करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, यासाठी आजाद समाज पार्टी व भीम आर्मी तसेच इतर अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून गुरुवारी (दि. २०) पुणे पोलिस आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 21 Jul 2023
  • 11:59 am
106-crore alleged : बिल्डरकडून १०६ कोटींचा कथित बांधकाम घोटाळा, गुन्हा दाखल होऊनही तपास “जैसे थे”

बिल्डरकडून १०६ कोटींचा कथित बांधकाम घोटाळा, गुन्हा दाखल होऊनही तपास “जैसे थे”

आरोपींना अटक करून कारवाई करा, आजाद समाज पार्टी रस्त्यावर

पुण्यातील पिसोळी शहरातील एका कथित बांधकाम घोटाळ्यात प्रसिद्ध एआरव्ही ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक राहुल आणि आकाश गोयल यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात १५.८० कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतची मिररने १४ जुलैच्या अंकात बातमी दाखवली होती. मात्र या प्रकरणात शेतकरी कुणाल मासाळ व त्यांच्या इतर कुटुंबीयांची १०६ कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. गुन्हा दाखल करून १५ दिवस उलटलेत. मात्र, पोलीसांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे, आरोपींना अटक करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, यासाठी आजाद समाज पार्टी व भीम आर्मी तसेच इतर अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून गुरुवारी (दि. २०) पुणे पोलिस आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे.

पुण्यातील पिसोळी येथील शेतकरी कुणाल मासाळ व त्यांच्या इतर कुटुंबीयांची २०१३ साली एआरव्ही ग्रुपने १६.९० गुंठे जमिन बांधकाम साईटसाठी खरेदी केली होती. या करारामध्ये ३८ टक्के पैसे शेतकऱ्याला जातील. तर उर्वरित बिल्डरला जातील, असे संगनमताने ठरले होते. डिसेंबर २०१३ मध्ये अंतिम करार होऊन बिल्डरने जमिनीचा ताबा घेतला. हा प्रकल्प ६० महिन्यांत पूर्ण होणार होता. मात्र, या कालावधीत पुर्ण न झाल्याने दोन्ही गटाच्या संमतीने अतिरिक्त १२ महिने प्रकल्पासाठी देण्यात आले होते. यात शेतकऱ्याला मिळणारा ३८ टक्के त्यांच्या बँक खात्यात न जमा करता बिल्डरनी स्वत:च्या खात्यात रक्कम जमा केल्याचा आरोप शेतकरी मासाळ यांनी केला आहे.

याप्रकरणी शेतकऱ्याने न्यायालयात चकरा मारल्यानंतर अखेर कोंढवा पोलिस ठाण्यात एआरव्ही ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक राहुल आणि आकाश गोयल यांच्यावर कलम ४०६, ४०९, ४२०, ५०६, ५०४, ३४, १२०ब नुसार ८ जुलै रोजी १५.८० कोटींच्या कथित बांधकाम घोटाळ्या प्रकरणी दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची बातमी मिररने १४ जुलैच्या अंकात दाखवली होती. मात्र, आता ही रक्कम १०६ कोटींच्या घरात असून आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, या मागणीसाठी आजाद समाज पार्टी व भीम आर्मी तसेच इतर अनेक सामाजिक संघटनांनी आदोलन सुरू केले आहेत.

याबाबत आंदोलनादरम्यान माहिती देताना वकील तौफिक शेख म्हणाले की, करारामध्ये ३८ टक्के पैसे शेतकऱ्याला जातील. तर उर्वरित बिल्डरला जातील, असे ठरले होते. मात्र आरोपींनी कोणत्याही प्रकारची रक्कम शेतकऱ्याला दिली नाही. जवळपास ९० टक्के काम पुर्ण करून परस्पर स्वतच्या खात्यात जमा केले. याची पुर्ण रक्कम पाहिली तर १०५ कोटींहून अधिक म्हणजे १०६ कोटींच्या घरात आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. गंभीर बाब अशी आहे की शेतकऱ्यांनी पोलीसांकडे धाव घेतली तेव्हा पोलीसांनी एक ते दीड वर्ष गुन्हा दाखल कऱण्यात टाळाटाळ केली. यातील एका प्रमाणिक अधिकाऱ्याने या गुन्ह्याचा तपास कऱण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची तात्काळ बदली करण्यात आली. न्यायालयात धाव घेतल्यानंतर दिवाणी अखेर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला. मात्र, आज १५ दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आरोपींना अटक करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest