मोरवाडी मेट्रो स्टेशनच्या चौथ्या जिन्याचे काम अखेर सुरू

महामेट्रोचे पिंपरी (पीसीएमसी) मेट्रो स्टेशनच्या चौथ्या जिन्याचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मोरवाडी चौकात होणारी प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 29 Nov 2024
  • 05:20 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

आता पालिका भवनाच्या नागरिकांना प्रवास करणे झाले अधिक सुलभ

महामेट्रोचे पिंपरी (पीसीएमसी) मेट्रो स्टेशनच्या चौथ्या जिन्याचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मोरवाडी चौकात होणारी प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

पिंपरीतील मोरवाडी चौकात महापालिका भवन लगत मेट्रो स्टेशन सुरू होऊन अनेक वर्षे झाली आहेत. या स्टेशनहून सिव्हिल कोर्ट स्टेशनपर्यंत मेट्रो १ ऑगस्ट २०२३ पासून धावत आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील मेट्रोच्या दोन्ही प्रकल्पांपैकी पिंपरी मेट्रो स्टेशनला प्रवाशांचा सर्वांधिक प्रतिसाद आहे. येथून महामेट्रोला सर्वाधिक उत्पन्न मिळत आहे.

प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असल्याने या स्टेशनखाली वाहनांची पार्किंग मोठ्या संख्येने असते. पदपथावरही वाहने लावली जात असतात. तसेच, रिक्षा बेशिस्तपणे थांबत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. प्रवाशांची मोठी संख्या असल्याने मेट्रो स्टेशनवर ये-जा करण्यासाठी तीनही जिन्यांचा वापर केला जातो. मोरवाडीच्या या मेट्रो स्टेशनला नियमितपणे प्रवाशांची मोठी गर्दी असते.

प्रत्येक स्टेशनला खालील दोन्ही बाजूस मेट्रोचे चार जिने, लिफ्ट व एक्सलेटर असतात. पिंपरी येथे तीनच जिने आहेत. चौथा जिना कमला क्रॉस बिल्डिंग समोर आहे. तेथील काम अर्धवट स्थितीत सोडून  देण्यात आले होते. त्यामुळे त्या परिसरात कचरा व पावसाचे पाणी साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते.

दरम्यान, अखेर महामेट्रोने त्या जिन्याचे काम सुरू केले आहे. हा जिना पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या पलीकडील बाजूने कमला क्रॉस बिल्डिंगसमोरील पदपथावरून स्टेशनकडे ये-जा करणे प्रवाशांसाठी सुलभ होणार आहे. नागरिकांना मोरवाडी चौकात रस्ता क्रॉस करण्याची गरज भासणार नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest