महिला दिन विशेष: वाहन चालवण्यात महिलांचा टॉप गियर

पुरुषांसमवेत सर्वच क्षेत्रामध्ये खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच पुरुषांची मक्तेदारी असलेल्या वाहनचालक व्यवसायातही महिलांनी आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.

Women's Day

वाहन चालवण्यात महिलांचा टॉप गियर

वाहन परवाना मिळवण्यात महिलांचा टक्का वाढला, उदरनिर्वाह, व्यवसायासाठी निवडला वाहन चालवण्याचा मार्ग

पंकज खोले
पुरुषांसमवेत सर्वच क्षेत्रामध्ये खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच पुरुषांची मक्तेदारी असलेल्या वाहनचालक व्यवसायातही महिलांनी आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. गेल्या काही वर्षात महिलांच्या वाहन परवान्यांचा आकडा वाढला आहे. वाहन परवाना मिळवण्यासाठी दाखल प्रस्तावातील निम्म्याहून अधिक प्रस्ताव महिलांचे असून, मागच्या तीन वर्षांत जवळपास ७५ हजार महिलांनी वाहन परवाने काढले आहेत. (Women's Day)

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (Pimpri Chinchwad RTO) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत चारचाकी वाहन परवान्यांबाबत महिलांच्या अर्जांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये जवळपास ३० हजाराहून अधिक महिलांनी वाहन परवाना काढला आहे, तर त्याच पटीत आणखी नव्याने अर्ज देखील आले आहेत.

आयटी, उद्योग, व्यवसाय, शैक्षणिक या सर्वच क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आहे. तर यापूर्वी वाहन आणि त्या संबंधित व्यवसायावर पुरुषांची मक्तेदारी होती. वाहन चालवताना क्वचितच महिला दृष्टीस पडत असे. मात्र, आता या व्यवसायातही महिलांनी आपली चमक दाखवून दिली आहे. रिक्षा चालक, रुग्णवाहिका चालक, टेम्पो चालक,  टॅक्सी चालक ते एसटी चालक महिलांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या व्यवसायातही महिलांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. प्रादेशिक परिवहन उप प्रादेशिक अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले की, आम्ही महिलांच्या वाहन परवान्यांबाबत विशेष काळजी घेत असून, तशा सूचना प्रत्येक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

... म्हणून वाढला टक्का

कंपनीतील आठ तास नोकरीपेक्षा अनेक महिला व्यवसायाकडे वळल्या आहेत. त्यात कोरोना काळात अनेकांनी नवीन व्यवसायदेखील सुरू केले. त्याच जोडीला रिक्षा अथवा टॅक्सीचालक म्हणून महिला हा व्यवसाय करू लागल्या आहेत. त्यामुळे वाहन परवाना काढण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, निगडी येथे स्वतंत्र महिला रिक्षा स्टॅन्डदेखील अस्तित्वात आहे. पुणे जिल्हा परिसरात जवळपास १०० महिला आजही रिक्षा चालवत आहेत.

आरटीओकडून देखील मदत

 परवानासाठी स्वतंत्र मार्गिका आणि सुलभ प्रक्रिया

 महिला वाहन चाचणीसाठी महिला आरटीओ अधिकाऱ्यांची नेमणूक

 महिलावर्गासाठी मार्गदर्शक अधिकारी मदतीला

 महिलांचे हेलपाटे वाचण्यासाठी त्वरित वाहन परवाना

आरटीओकडून महिला वाहन परवानाधारकांना कोठेही ताटकळत थांबू नये, यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमले आहेत. त्यांना आवश्यक मार्गदर्शन व वाहनविषयक माहिती देत असतो.

- मनोज ओतारी, सहायक परिवहन अधिकारी

पुणे जिल्ह्यामध्ये वेळप्रसंगी महिला चालक देतो. सुरक्षित आणि सेफ ड्राईव्ह म्हणून महिलावर्गाला प्राधान्य देत आहे. आजकाल प्रत्येक महिलेने वाहन चालवणे शिकणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेतले आहे. प्रत्येक महिलांनी महिलावर्गासाठी पुढाकार घेऊन वाहन चालवण्याचे प्रशिक्षण द्यावे.

-दीपाली कडू,  सखी सारथी

कोरोनाच्या काळात नोकरी गेल्याने रुग्णवाहिका म्हणून काम सुरू केले. आज तीन वर्ष झाली सेवा देत आहे. आम्ही दोघी बहिणी हे काम करत आहोत. आणखी काही महिला चालक म्हणून काम करण्यासाठी तयार झाल्या आहेत.

-वनिता गिरी, महिला रुग्णवाहिका चालक

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest