Pimpri-Chinchwad News : आठ दिवसांपासून कुत्र्याच्या तोंडात अडकली बरणी अन्...

शहरातील भटक्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष होत असते. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये एका कुत्र्याच्या तोंडात बरणी अडकली होती. आठ दिवसांपासून तो कुत्रा त्या परिस्थितीत फिरत होता. तोंडात बरणी अडकली असल्याने त्याला काही खाताही येत नव्हते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Tue, 10 Oct 2023
  • 11:31 am
Pimpri-Chinchwad News

आठ दिवसांपासून कुत्र्याच्या तोंडात अडकली बरणी

किवळे गावातील भटक्या कुत्र्याच्या तोंडात अडकली प्लास्टिकची बरणी; प्राणीिमत्रांनी वाचवले श्वानाचे प्राण

विजय चव्हाण
शहरातील भटक्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष होत असते. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) एका कुत्र्याच्या तोंडात बरणी अडकली(jar gets stuck in a dog) होती. आठ दिवसांपासून तो कुत्रा त्या परिस्थितीत फिरत होता. तोंडात बरणी अडकली असल्याने त्याला काही खाताही येत नव्हते. पिंपरी-चिंचवडजवळ असणाऱ्या किवळे गावातील एका भटक्या कुत्र्याच्या (dogs) तोंडात प्लॅस्टीकची बरणी अडकली होती. आठ दिवसांपासून तो कुत्रा त्या परिस्थितीत फिरत होता. तोंडात बरणी असल्यामुळे त्याला काहीच खात, पिता येत नव्हते. त्याच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्याची ही परिस्थिती पाहून अनेकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु भीतीमुळे तो कोणाच्या हाती लागत नव्हता.

असे आले पकडण्यात यश

परिसरातील त्रिशूल मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्या कुत्र्याची माहिती मिळाली. मग त्याला पकडण्यासाठी तरुणांनी प्रयत्न सुरू केले. त्या कार्यकर्त्यांना कुत्र्याला पकडण्यात यश आले. त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन पथकाला पाचारण केले. इतक्या दिवसांपासून तोंड बरणीत असल्याने त्या कुत्र्याचे तोंड सडू लागले होते. पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे त्याच्या शरीरात त्राण उरला नव्हता. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यांचा उपद्रव मागील दोन वर्षात त्रासदायक ठरत आहे. चिखली प्रभागातील जाधववाडी, मोशी,  शिवाजीनगर, कुदळवाडी तसेच या परिसरातील हौसिंग सोसायट्यांच्या आसपास, चाळी-चाळीत, चौकात, भाजी मंडई, चिकन-मटण दुकानांच्या आसपास भटक्या कुत्र्यांची टोळी उच्छाद घालत वावरत असते. एकेकाळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘डॉग व्हॅन’ कुत्री पकडण्यासाठी फिरायच्या. आता दोन वर्षे झाली पण व्हॅन फिरत नाहीत. त्यामुळे भटकी कुत्री बिनधास्त झाली आहेत. १९४९ च्या मनपा कायद्यानुसार भटकी कुत्री बंदोबस्त व रेबीज उपचार यावर प्रशासनाने प्राधान्याने कार्यवाही करून शहरातील नागरिकांना भटक्या कुत्र्यांपासून मुक्ती दिली पाहिजे. अहोरात्र कुत्र्यांच्या टोळक्यातील भांडणे आणि रात्री-बेरात्री त्यांचे अरण्यरुदन यामुळे भय निर्माण झाले आहे. मनपाने शहरातील सर्व भटकी कुत्री बेवारस फिरण्यापेक्षा त्यांच्यासाठी डॉग होस्टेल्स बांधून त्यांची नसबंदी, देखभाल करावी. प्राणी हक्क कायद्यानुसार पालनपोषण करण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत सरकारकडून विशेष निधी मंजूर करून घ्यावा, अशी मागणी चिखली येथील युवा सामाजिक कार्यकर्ते रोहन चव्हाण यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात २०२२ मध्ये १० हजार जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती उपलब्ध आहे. तसेच बऱ्याच दुचाकी वाहनांचे अपघात अशा भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केल्याने झाले आहेत. भटक्या कुत्र्यांना  'रेबीज इन्फेक्टर' असे संबोधून त्यांची शहरातील संख्या कमी करण्यासाठी प्राणी हक्क कायद्यात तरतूद करावी. भटकी कुत्री पकडून ती जंगलात सोडून द्यावी, जेणेकरून हिंस्त्र जनावरांना खाद्य निर्माण होईल. भटकी कुत्री हा देशासाठी कोणत्याही सार्वजनिक हितासाठी उपयुक्त प्राणी नाही. भटकी कुत्री चावल्याचे आढल्यास महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा म्हणजे या विषयाकडे गांभीर्याने पाहिले जाईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest