संग्रहित छायाचित्र
बटेंगे तो कटेंगे असे म्हणत सामाजिक विषमता पसरविणाऱ्या गलिच्छ राजकारणाचा आम्ही निषेध करतो. असे म्हणत पिंपरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत नक्की निवडून येणार असा विश्वास बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
आकुर्डी येथील खंडोबा माळ मैदानात पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास मतदारसंघातील हजारो महिला भगिनींनी तुफान गर्दी केली होती.
खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आम्ही चालवतो. मात्र भारतीय जनता पार्टी बटेंगे तो कटेंगे असे म्हणत समाजात दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण कोविड काळात रेमडीसीवर लस घेतली ही लस तयार करणारे याकूब सईद हे आहेत तर दुसरी कोविशील्ड लस बनवणारे आदर पूनावाला हे पारशी आहेत. यांनी आपले जीव वाचवले हे विसरून चालणार नाही. असेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. हे कसले राजकारण असे म्हणत महाराष्ट्रात आता क्रांती घडवायची आहे. सामाजिक परिवर्तन हे विचारातून होते हे विचार पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी जोपासले आहेत. ही एकटी महिला 100 जणांना भारी आहे. असे म्हणत समाजाची सेवा करणे हे लोकप्रतिनिधीचे काम आहे. दडपशाहीला मुठमाती देऊन सुलक्षणा शिलवंत यांच्यासारखी उच्चशिक्षित महिला नक्की विजयी होईल असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघर्षाच्या काळात काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पाठीशी उभा राहिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत आपण या पक्षाच्या नेत्यांना आयुष्यभर विसरणार नाही असे सांगितले.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण म्हणणार नाही तर महालक्ष्मी म्हणणार आणि दरमहा 3000 रुपये देणार असल्याचे सांगत यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार कारण मायबाप जनता आमच्या बाजूने आहे असे त्यांनी सांगितले. त्यापुढे म्हणाले की जे पक्षातून बाहेर गेले ते एकमेकांचे पार्टनर होते म्हणून बाहेर पडले आहेत. विद्यमान आमदार व महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी गेल्या दहा वर्षात सभागृहात एकही प्रश्न विचारला नसल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त करत अशा माणसाला कसे निवडून दिले असा प्रश्न मतदारांना विचारला. आमदार गाड्या फिरवायला व फ्लॅट खरेदी करायला आमदार नसतो तर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून त्याने काम करायचं असते. सुलक्षणा शिलवंत यांनी निवडून आल्यानंतर हे समाजाचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी राज्याच्या अधिवेशनाला 100% उपस्थिती दाखवली पाहिजे अशी मतदार म्हणून अपेक्षा असल्याचे मत त्यांनी मांडले.
सुलक्षणा शिलवंत यांनी रस्ता, वीज, पाणी व न्याय यासाठी कणखर भूमिका मांडली पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले.
बारामती लोकसभा मतदारसंघात आपण मेरिट वर निवडून आलो आहोत. कुठले दोन पक्ष फोडून निवडून आलेलो नाही असे सांगत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एका पुस्तकात आपण भारतीय जनता पार्टी बरोबर असल्यामुळे आपल्याला ईडी, सीबीआय याची भीती नाही आपण शांतपणे झोपू शकतो असे म्हटले असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
पिंपरी विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत यावेळी बोलताना म्हणाल्या की, काल अजित पवारांनी माझी उमेदवारी कशी कापली याबाबत सभेत माहिती दिली. या संदर्भात सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या की तुम्हाला सुशिक्षित माणसे नको का? फक्त निष्क्रिय माणसेच हवीत का? असा सवाल त्यांनी अजित पवार यांना विचारला. शहरातील चार माणसांचा विकास म्हणजे विकास झाला का? असा प्रश्न करत पिंपरी चिंचवड शहराचा विकास आहे तरी कुठे? हा सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न असल्याचे म्हणत केवळ शहरातील चार पाच जणांचा विकास झाला आहे व त्यांचा विकास म्हणजे अजित पवारांना विकास वाटतो का असे म्हणत कालच्या सभेत पवार साहेबांना केवळ एकच उमेदवार दिसतो का असे विचारणाऱ्या अजित पवारांना सुलक्षणात शीलवंत यांनी विचारले की गेली पंधरा वर्षे तुम्हाला एकच उमेदवार दिसतो का? हा निष्क्रिय माणूस किती वर्षे लादणार? झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली या आमदाराने व त्याच्या कार्यकर्त्यांनी मलिदा लाटला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. एमआयडीसीतल्या कंपन्या शहराबाहेर गेल्या. कोविड काळात हे आमदार कोठेच रिचेबल नव्हते. असे आमदार नक्की कोणासाठी काम करतात? आणि त्याचमुळे अशा निष्क्रिय उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन करण्यासाठी अजित पवारांना माझ्याकडे बघून मतदान करा असे असे म्हणावे लागते हे त्यांचे दुर्दैव असल्याचे सुलक्षणा शिलवंत यांनी सांगितले.
आता काही लोक धमकी देण्याचे काम करतील परंतु त्याला घाबरण्याचे कारण नाही. कारण त्यांचा बाप आदरणीय शरद पवार साहेब आपल्या सोबत आहेत. त्यामुळे कोणाच्याही धमकीला घाबरण्याची गरज नाही. असेही सुलक्षणा शिलवंत यांनी यावेळी सांगितले.
या सभेत माजी आमदार गौतम चाबुकस्वार, ज्येष्ठ सामाजिक नेते मानव कांबळे, काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष राज राजापूरकर, प्रदेश प्रतिनिधी स्वाती चिटणीस, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते प्रकाश पाटील, लघुउद्योजक संघटनेचे नेते तात्या सपकाळ, माजी नगरसेविका स्मिता कुलकर्णी, आम आदमी पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मीनाताई जावळे, डॉ. मनीषा गरुड, दीपमाला गोखले, शांता गवळी, सुषमा शिंदे, भारती नलावडे, वैशाली कुलथे, शिल्पा बिडकर, विश्रांती पाडळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष तुषार कामठे आदींची यावेळी भाषणे झाली.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत या आज सभास्थळी उपस्थित झाल्यानंतर त्यांनी उपस्थित राहिलेल्या प्रत्येक महिलेची भेट घेतली. अनेकांशी हस्तांदोलन केले तर अनेकांना गळा भेट दिली. यावेळी सुलक्षणा शिलवंत यांनी महिला कार्यकर्त्यांबाबत दाखवलेला हा आदरभाव पाहून अनेक महिला कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
ही शिक्षण घेतलेली वाघीण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही
आज महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या महिला मेळाव्यात अनेक महिला भगिनींनी उस्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ज्यांनी कधीच व्यासपीठावर भाषण केले नाही अशा महिला समोर येऊन व्यासपीठावरून आपल्या घणिघाती प्रतिक्रिया व्यक्त करत होत्या. त्यामुळे सभागृहात सतत टाळ्यांचा कडकडाट होत होता.
सुषमा शिंदे ही एक सामान्य कार्यकर्त्या आपल्या आवेश पूर्ण भाषणात म्हणाल्या की, डॉ. सुलक्षणा शिलवंत या शिक्षण घेतलेली वाघीण आहे आणि त्यामुळे ती गुरगरल्याशिवाय राहणार नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.