संग्रहित छायाचित्र
पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघात मतदारांना उमेदवार पसंत नसल्याने 'नोटा' लाही मोठे मतदान होत आहे. यामध्ये चारही विधानसभा मतदारसंघातील २०१९ च्या निवडणुकीत १४ हजार २४६ मतदारांनी नोटाला मतदान केले. चिंचवड मतदारसंघात नोटाला सर्वाधिक ५ हजार ८७४ मतदान झाले, तर मावळात सर्वात कमी १ हजार ४९० मतदारांनी नोटाला मतदान केले आहे.
निवडणूक आयोगाने मतदानासाठी १९९० पासून ईव्हीएम मशिनचा वापर सुरू झाला. त्यापूर्वी बॅलेट पेपरवर मतदान होत असे. ईव्हीएमवर २०११ मध्ये नोटाचा वापर सुरू झाला. त्यापूर्वी नोटा अस्तित्वात नव्हता. उमेदवारांची नावे आणि त्यांच्या चिन्हानंतर सर्वात शेवटी यापैकी कुणीच नाही म्हणजे नोटा या पर्यायाचा वापर सुरू झाला. सरासरी दरवर्षी प्रत्येक मतदारसंघात ०.५० ते दोन टक्के पर्यंत नोटाला मतदान होते.
लोकसभा निवडणुकीत तीन ते पाच टक्क्यांपर्यंत नोटाला मतदान झालेले आहे. ईव्हीएम मशिनवर दर्शविलेल्या २०११ मध्ये उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर, वरीलपैकी कोणीही नाही म्हणजे नोटा हा पर्याय निवडणे मतदारांना शक्य झाले. संख्या ही अधिक असेल तर, ती निवडणूक रद्द होते. संबंधित मतदारसंघात फेरनिवडणूक घेतली जाते. आतापर्यंत असा प्रसंग उद्भवलेला नाही. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघात एकूण ११ हजार ९१ मतदान नोटाला झाले होते. त्यामध्ये सर्वांत जास्त पिंपरी मतदारसंघात ४ हजार ४३२ मतदान नोटाला झाले होते. त्या खालोखाल चिंचवड मतदारसंघात ३ हजार २०३ मतदारांनी नोटाला मतदान केले होते, तर भोसरी मतदारसंघात १ हजार ४४७ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला होता. सगळ्यात कमी मावळ मतदारसंघात २ हजार मतदारांनी नोटाला पसंती दिली होती.
२०१९ ला १४ हजार मतदार
२०१९ ला विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघात एकूण १४ हजार २४६ मतदान नोटाला झाले होते. त्यामध्ये सर्वांत जास्त चिंचवड मतदारसंघात ५ हजार ८७४ मतदान नोटाला झाले होते. त्या खालोखाल पिंपरी मतदारसंघात ३ हजार २४६ मतदारांनी नोटाला मतदान केले होते, तर भोसरी मतदारसंघात ३ हजार ६३६ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला होता. सगळ्यात कमी मावळ मतदारसंघात १ हजार ४९० मतदारांनी नोटाला पसंती दिली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.