संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जन सोहळ्यासाठी शहरातील काही विसर्जन घाटावर तसेच, गणेश मंडळांच्या स्वागतासाठी मंडप उभारण्यात आले होते. महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयाने उभारलेल्या मंडपांचा खर्च ३७ लाख रूपये इतका झाला आहे.
महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी विसर्जन घाट आणि मुख्य मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळांचे स्वागतासाठी मंडप उभारण्यात येतात. चिंचवड येथील ब क्षेत्रीय कार्यालयाने विसर्जन घाट व स्वागतासाठी मंडप उभे केले होते. तसेच, इतर कार्यक्रमांसाठी मंडप उभारले होते. त्याचा एकूण खर्च ३६ लाख ९६ हजार ९४८ रूपये इतका झाला आहे. हे काम अण्णा कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने केले आहे. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.