संग्रहित छायाचित्र
पिंपरी विधानसभेतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा नैतिकतेची पातळी सोडून प्रचार करतानाचा धक्कादायक प्रकार दापोडी येथे उघडकीस आला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या पॅम्प्लेटवर शरद पवारांच्या उमेदवाराची निशाणी चिकटवून प्रचार केला जात होता. दापोडी येथील कार्यकर्त्या सुप्रिया काटे यांनी हा प्रकार रंगेहात पकडला आहे.
राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध स्तरातून भरघोस पाठिंबा मिळत आहे. दिवसेंदिवस प्रचारामध्ये हजारो कार्यकर्ते, महिला सहभाग घेत आहेत. तसेच स्थानिक पातळीवर महायुतीमधील घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून स्वतंत्रपणे प्रचार केला जात आहे. महायुतीने राबविलेल्या विविध योजना, केलेली विकास कामे यामुळे नागरिकांची आमदार अण्णा बनसोडे यांना पसंती मिळत आहे.
असे असताना विरोधकांकडून अतिशय चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शरद पवार यांच्या उमेदवाराला जनमताचे आपले पारडे हलके होत असल्याचे दिवसेंदिवस स्पष्ट होत असल्याने विरोधकांकडून अतिशय चुकीच्या पद्धतीने प्रचाराचा फंडा अवलंबला जात आहे.
दापोडी येथील प्रमुख कार्यकर्त्या सुप्रिया काटे या आमदार अण्णा बनसोडे यांचा घरोघरी जाऊन प्रचार करत होत्या. त्यावेळी त्यांना काही लहान मुलांनी आमदार बनसोडे यांचे पॅम्प्लेट मागितले. अचानक लहान मुलांनी मोठ्या प्रमाणात पॅम्प्लेट मागितल्याने सुप्रिया काटे यांनी लहान मुलांचा पाठलाग केला. लहान मुलांनी हे पॅम्प्लेट दापोडी मधील आप्पा गायकवाड आणि राम उप्पर या दोन तरुणांना दिले. दोन तरुणांनी त्या पॅम्प्लेटवर शरद पवार गटाच्या उमेदवाराची निशाणी चिकटवून ते पॅम्प्लेट घराघरांमध्ये वाटले. सुप्रिया काटे यांनी हा संपूर्ण प्रकार रंगेहात पकडून विरोधकांकडून होत असलेल्या खालच्या पातळीवरील स्वार्थी आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या राजकारणाचा बुरखा फाडला.
सुशिक्षित म्हवणाऱ्या उमेदवाराचा बुरखा फाटला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार करण्यात येत आहे.
- सुप्रिया काटे
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.