संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील गोर-गरीब कॅन्सरग्रस्त रूग्णांना (cancer patients) अल्प दरात उपचार मिळावेत यासाठी महापालिकेच्या वतीने थेरगावमध्ये पीपीपी तत्वावर रूग्णालय उभारण्याचे नियोजन (Thergaon) आहे. यासाठी पालिकेच्या वैद्यकीय (PCMC News) विभागाचे एक पथक सुरत शहरातील पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर सुरू असलेल्या रूग्णालयाची पाहणी करण्यासाठी पुढील आठवड्यात जाणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह (Shekhar Singh) यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय सुविधा या उच्च दर्जाचा आहेत. गेल्या काही वर्षांत कॅन्सरग्रस्त रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, कॅन्सरग्रस्त रूग्णांसाठी उपचाराची पालिकेच्या रूग्णालयात सोय उपलब्ध नाही. त्यामुळे पालिकेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सर रूग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. मात्र, त्याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. आयुक्त सिंह यांनी यासाठी पाऊले उचलली आहेत.
थेरगाव येथील रूग्णालयाच्या जवळ ३४ ते ३५ गुंठे जागा आहे. या जागेत पीपीपी तत्वावर कॅन्सर रूग्णालय उभारण्याचे पालिकेचे नियोजन आहे. यासाठी निविदेची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. निविदा झाल्यापासून दीड ते दोन वर्षांत रूग्णालय उभारण्याचा मानस वैद्यकीय विभागाचा आहे. रूग्णालय झाल्यानंतर महापालिका ठरवून देईल, त्यानुसारच दर आकारणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.