वाकडच्या झोपडपट्टीधारकांचा ‘एसआरए’ प्रकल्पाला विरोध!

पिंपरी चिंचवड: वाकड येथील काळाखडक झोपडपट्टीधारकांचा झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन (एसआरए) प्रकल्पाला विरोध आहे. एसआरए कार्यालयावर ‘संविधान मोर्चा’ काढण्यात येणार आहे.

वाकडच्या झोपडपट्टीधारकांचा ‘एसआरए’ प्रकल्पाला विरोध!

बेकायदेशीर सर्व्हे रद्द करण्याची मागणी, एसआरए कार्यालयावर धडकणार संविधान मोर्चा

पिंपरी चिंचवड: वाकड (Wakad) येथील काळाखडक झोपडपट्टीधारकांचा झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन (एसआरए) प्रकल्पाला विरोध आहे. एसआरए कार्यालयावर ‘संविधान मोर्चा’ काढण्यात येणार आहे.

वाकडमधील काळाखडक (Kalakhadak) झोपडपट्टीधारकांनी ‘एसआरए’चा विरोध करण्यासाठी काळाखडकमध्ये निर्धार सभेचे आयोजन केले होते. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसंदर्भात नागरिकांचा विरोध असल्याने ५०० सह्यांचे पत्र अपना वतन संघटनेकडे देण्यात आले होते. या बैठकीत नागरिकांनी अनेक अडचणी मांडल्या. 

निरक्षर महिलांना खोटी माहिती देऊन, भीती दाखवून संमती घेऊन दिशाभूल, फसवणूक केल्याचे सांगितले. तसेच पोलीस बळाचा वापर करून नागरिक, महिला, कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन करून, गुन्हे दाखल करण्याची धमकी देत बेकायदेशीर सर्व्हे केल्याचे नागरिक सांगत आहेत.

अपना वतन संघटनेची सिध्दिकी शेख यांनी सांगितले की, नागरिकांचा एसआरए प्रकल्पाला विरोध असेल तर, बिल्डर, प्रशासन जबरदस्ती का करत आहे? कायदा हा लोकांसाठी आहे. त्यामुळे लोकांच्या भावनेचा, मागणीचा विचार झाला पाहिजे. 

विकसकांकडून कुठल्याही प्रकारची लेखी हमी घेतली जात नाही. पैशाच्या व गुंडगिरीच्या जोरावर प्रकल्प रेटून नेला जातो. त्यामुळे एसआरए कार्यालयाच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराविरोधात संविधान मोर्चा काढणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

झोपडपट्टीधारकांच्या मागण्या

 बळाचा वापर करून केलेला बेकायदेशीर सर्व्हे करा

 गोरगरीब, कष्टकरी, दलितांची दिशाभूल केल्याबाबत विकसकांवर कारवाई करा.

 पात्रता यादी बनवणारे तहसीलदार, सर्व्हेक्षकांच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करा 

 काळाखडक येथील जागेच्या खरेदी-विक्री प्रक्रियेची चौकशी करा

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest