लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पिंपरी-चिंचवडमध्ये ग्वाही

पिंपरी-चिंचवड: राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, राज्य दिवाळखोरीत निघाले आहे, असे विरोधक सांगत आहेत. त्याकडे कुणीही लक्ष देऊ नका, मी राज्याचा दहावा अर्थसंकल्प मांडला आहे. महाराष्ट्र राज्य मजबूत असून आर्थिक परिस्थिती चांगली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 10 Oct 2024
  • 01:43 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पिंपरी-चिंचवडमध्ये ग्वाही

राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत मजबूत असल्याचाही केला दावा

पिंपरी-चिंचवड: राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, राज्य दिवाळखोरीत निघाले आहे, असे विरोधक सांगत आहेत. त्याकडे कुणीही लक्ष देऊ नका, मी राज्याचा दहावा अर्थसंकल्प मांडला आहे. महाराष्ट्र राज्य मजबूत असून आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आपल्याला केंद्राकडून सर्वात जास्त वस्तू व सेवा कर (जीएसटी) मिळतो. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत मजबूत  असल्याने लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कळ दाबून ऑनलाईन पद्धतीने शहरातील विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. यामध्ये १४ विविध कामांचे माचे लोकार्पण, २० प्रकल्पांचे तर १४ रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच पिंपरी व आकुर्डी येथील गृहप्रकल्पाचे प्राथमिक स्वरूपात सदनिका वाटप करण्यात आले. अजित पवार म्हणाले, राज्यात नवरात्र सुरू आहे. त्यात स्त्री शक्तीचा जागर होत आहे. राष्ट्रनिर्मितीत स्त्रियांचे योगदान महत्वाचे आहे. शहरात १७०० कोटी रुपयांची कामांचे उदघाटन करण्यात आले. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून विविध कामे करत आहोत. पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी आहे. त्यात शहराची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे मूलभूत गरजाचा पोहचवता आले पाहिजे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सुविधा पुरवताना ताण येत आहे. राज्याच्या विकासाचे इंजिन म्हणून शहराकडे पाहिले जात. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहर नियोजन पद्धतीने वाढले पाहिजे. त्यातून विकास कामे झाली पाहिजेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. योग्य व सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी काम सुरू आहे. या कामामध्ये सातत्य राहिले पाहिजे. राहिलेली कामे जोमाने होतील, मेट्रोचे कामे लवकर कशी होतील, याचा प्रयत्न सुरु आहे. असेही पवार म्हणाले.

दहशत, गुंडगिरी, दादागिरी खपवून घेणार नाही
अजित पवार म्हणाले, लोकप्रतिनिधीच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी सूचना आयुक्तांना केली आहे. राहिलेली कामे जोमाने होतील, मेट्रोची कामे लवकर कशी होतील, याकडे पाहिले पाहिजे. कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे. नागरिकांना मोकळेपणाने फिरता आले पाहिजे. कोणाकडून चुक होता कामा नये, दहशत, गुंडगिरी, दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारसरणी अंगिकरून आपण समाजात वावरले पाहिजे. देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य करत असताना सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन
बोपखेल येथे मुळा नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या लोकार्पण, पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने स्थायी आदेश पुस्तिकेचे प्रकाशन व नवीन शासकीय वाहनांना हिरवा झेंडा दाखविण्याचा कार्यक्रम होणार आहे. इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल (आयसीसीसी)चे लोकार्पण, निगडी प्राधिकरण येथे हरित सेतू विषयक कामांचे लोकार्पण, पिंपळे सौदागर येथील पवना नदीवर उभारलेल्या पुलाचे लोकार्पण, रक्षक चौकात सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावर भुयारी मार्ग (सबवे ) उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मुळा नदीकाठ सुधारणा प्रकल्प टप्पा एकचे शुभारंभ, मुळा नदीवर सांगवी ते बोपोडी दरम्यान उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण झाले. पिंपरीत माता रमाई स्मारकाचे काम हाती घेण्याची सूचनाही पवार यांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest